आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MIvsRCB : डेव्हिलियर्सचे वादळी शतक, बंगळुरूकडून मुंबईचा 39 धावांनी पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. आईपीएल-8 के 46 व्या सामन्यात रॉयल चैलेंजर्स बेंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 39 धावांनी पराभव केला. बेंगळुरूच्या 235 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 7 गडी गमावत 196 धावा काढल्या.
पार्थिव पटेल १९ धावांवर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा (१५ धावा)चा झेल हर्षल पटेलच्या चेंडूवर मंदीपने घेतला. कीरन पोलार्ड (44) ला एस. अरविंदने स्टार्कच्या हाताने झेल बाद केले. तर हार्दिक पांड्या चहलने षटकार ठोकण्याच्या नादात दिनेश कार्तिकच्या हातात झेल दिला. त्याने ८ धावा काढल्या.
बेंगळुरूने बनवले 235 धावा
विराट कोहलीने आज नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ख्रिस गेल अवघ्या 13 धावांवर बाद झाल्याने मुंबईच्या आशा वाढल्या होत्या. पण गेल बाद झाल्यानंतर मैदातानत उतरले ते एबी डिव्हीलियर्स नावाचे वादळ. डिव्हीलियर्सने आल्यापासून फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. दुसऱ्या बाजुला असलेला विराट कोहलीही त्याला चांगली साथ देत होता. डिव्हीलियर्सने 47 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्यात 15 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तसेच 133 धावा करत त्याने आयपीएलमधील सर्वोच्च धावांचा विक्रमही रचला आणि मुंबईसमोर 236 धावांचे डोंगर उभे केले.

रिकॉर्डतोड भागेदारी
डिविलियर्स आणि कर्णधार विराट कोहली (82 नाबाद) यांनी मैदानावर सर्वत्र चौकार षटकार ठोकत दुसर्‍या विकेटसाठी 215 धावांची रेकॉर्ड तोड भागेदारी केली. कोहली आणि डेव्हिलियर्स दरम्यान ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी भागेदारी असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे डेव्हिलियर्सने आयपीएल -8 मध्ये सर्वाधीक धावा काढण्याचा मान पटकावला आहे, तर आयपीएलमध्ये सर्वाधीक धावा काढणारा तो तीसरा खेळाडू बनसला आहे. डेव्हिलियर्सची साथ देत कोहलीनेसुध्दा 50 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकार ठोकले.
पुढील स्लाईडवर पाहा, सामन्याचे इतर फोटो...
बातम्या आणखी आहेत...