आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CSK vs RR: राजस्थानविरुद्ध चेन्नईचा विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानच्या हुड्डाला बाद केल्यानंतर रवींद्र जडेजा.
चेन्नई - महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जने रविवारी अाठव्या सत्राच्या अायपीएलमध्ये शानदार आठव्या विजयाची नाेंद केली. धाेनी ब्रिगेडने घरच्या मैदानावर शेन वाॅटसनच्या राजस्थान राॅयल्सचा १२ धावांनी पराभव केला. यासह चेन्नई संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झाला अाहे.

मॅक्लुमच्या (८१) झंझावातापाठाेपाठ रवींद्र जडेजा (४/११), माेहित शर्मा (३/२५) व ब्राव्हाे (२/४३) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर यजमान चेन्नई संघाने सुपर विजयाची नाेंद केली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने १५७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १४५ धावांमध्ये गाशा गुंडाळला. राजस्थानचा हा पाचवा पराभव ठरला.

मॅक्लुमचा अर्धशतकी दणका : चेन्नई सुपरकिंग्जची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर स्मिथ (६) व सुरेश रैना (३) झटपट बाद झाले. मॅक्लुमने ६१ चेंडूंत ८१ धावांची खेळी केली. मॅक्लुमने फाफ डुप्लेसिससाेबत शतकी भागीदारी केली. या दाेघांनी तिस-या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी करून संघाच्या धावसंख्येला गती दिली. डुप्लेसिसने २५ चेंडूंत तीन चाैकारांसह २९ धावा काढल्या. त्यानंतर धाेनीने नाबाद १३ अाणि ब्राव्हाेने १५ धावांची खेळी केली.
बातम्या आणखी आहेत...