माेहाली - जबरदस्त फाॅर्मात आलेल्या राेहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाने रविवारी वीरेंद्र सेहवागच्या किंग्ज इलेव्हन पंजाबला घरच्या मैदानावर धूळ चारली. मुंबई इंडियन्सने आठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर टी-२० क्रिकेट स्पर्धेत पंजाबवर २३ धावांनी मात केली. यासह मुंबई इंडियन्सने स्पर्धेच्या प्ले आॅफमधील
आपल्या आशा पल्लवित केल्या. मुंबई टीमचा नऊ सामन्यांत हा चाैथा विजय ठरला. अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या पंजाबला सातव्यांदा पराभवाला सामाेरे जावे लागले.
पुढे पाहा धावफलक
सामनावीर सिमन्स (७१) आणि पार्थिव पटेलच्या (५९) शतकी भागीदारीपाठाेपाठ मलिंगाच्या (२/३१) धारदार गाेलंदाजीच्या बळावर मंुबईने सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करणा-या मुंबई इंडियन्सने तुफानी फटकेबाजीच्या बळावर यजमान पंजाबसमाेर विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात पंजाबने ७ गड्यांच्या माेबदल्यात १४९ धावांपर्यंत मजल मारली. डेव्हिड मिलरने ४३ धावांची खेळी केली.
पंजाबची निराशाजनक सुरुवात झाली.
सेहवाग दाेन धावा काढून तंबूत परतला. मॅक्सवेल १२ धावांची खेळी करून बाद झाला. संघाला सावरण्यासाठी मुरली विजय (३९) व मिलर (४३) यांनी प्रयत्न केला. मात्र, मुंबइच्या धारदार गाेलंदाजीपुढे या दाेघांचाही प्रयत्न थिटा पडला. मलिंगाने चार षटकांमध्ये ३१ धावा देत दाेन गडी बाद केले.तत्पूर्वी मुंबईकडून सिमन्स, पटेलच्या झंझावातानंतर राेहित शर्माने २६, पाेलार्डने नाबाद ७ आणि रायडूने नाबाद ४ धावा काढल्या.
सिमन्स-पार्थिवची शतकी भागीदारी
मुंबईचा सलामीवीर सिमन्सने ५६चेंडूंत शानदार ७१ धावा काढल्या. यात ९ चाैकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. याशिवाय त्याने पार्थिव पटेलसाेबत संघाला १११ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. पार्थिवने ५९ धावा काढल्या.