आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL : Mumbai Indian's Lost Against Kings Eleven Punjab

IPL : भज्जीचा चित्तथरारक संघर्ष, मुंबईचा पंजाबकडून 18 धावांनी पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर १८ धावांनी चीत केले. दणकट फलंदाजी व शानदार गोलंदाजीच्या बळावर त्यांनी सामना जिंकला. कर्णधार जॉर्ज बेलीच्या (६१) नाबाद अर्धशतकाच्या बळावर ५ बाद १७७ धावा चोपल्या. प्रत्युत्तरात मुंबईला १५९ धावांवर रोखले.

धावांचा पाठलाग करताना एकवेळ मुंबईची अवस्था ६ बाद ५९ अशी बिकट झाली होती. मात्र, हरभजनच्या (२४ चेंडूंत ६४ धावा, ५ चौकार, ६ षटकार) वादळाने सामन्यात प्राण फुंकले. हरभजन अाणि सुचितने अवघ्या ३७ चेंडूंत १०० धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी पंजाबच्या वीरेंद्र सेहवाग (३६) आणि मुरली विजय (३५) या सलामीच्या जोडीने धडाक्यात सुरुवात केली आणि दहा धावांच्या सरासरीने पाच षटकांत पन्नास धावा कुटल्या. मात्र, वीरेंद्र सेहवाग आणि मुरली विजय पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर पंजाबचे फलंदाज ठरावीक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतू लागले.
सर्वांचे लक्ष असलेले ग्लेन मॅक्सवेल (६) आणि डेव्हिड मिलर (२४) मोठी खेळी करू शकले नाही. त्यानंतर जॉर्ज बेलीने (६१*) खेळाची सूत्रे आपल्या हाती घेत किंग्ज इलेव्हनला १७७ धावांपर्यंत नेऊन सोडले. बेलीने ३ षटकार व ३ चौकारांच्या मदतीने नाबाद अर्धशतक ठोकत यजमान मुंबईसमोर १७८ धावांचे लक्ष ठेवले.
पुढील स्लाइड्वर पाहा, सामन्याचा धावफलक