आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानची विजयी हॅटट्रिक, मुंबई इंडियन्स टीमचा स्पर्धेत सलग तिसरा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या राजस्थान राॅयल्स टीमने अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक केली. राजस्थानने मंगळवारी सामन्यात मुंबई इंडियन्सवर सात गड्यांनी शानदार विजय मिळवला. यासह राजस्थान संघाने स्पर्धेत सलग तिस-या विजयाची नाेंद केली. दुसरीकडे सुमार कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या स्पर्धेत सलग तिस-या पराभवाला सामाेरे जावे लागले. तिस-या विजयासह राॅजस्थान संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली.

स्टीव्हन स्मिथ (नाबाद ७९) अाणि जेम्स फाॅकनर (नाबाद ६) यांच्या अभेद्य ५२ धावांच्या भागीदारीच्या बळावर राजस्थान राॅयल्स संघाने १९.१ षटकांत सामना जिंकला. केराेन पाेलार्ड (७०) अाणि काेरी अँडरसन (५०) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६४ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात राजस्थान राॅयल्सने तीन गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले.

धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान संघाकडून अजिंक्य रहाणे (४६) अाणि सॅमसनने (१७) यांनी दमदार सुरुवात केली. त्यानंतर अालेल्या कर्णधार स्मिथने रहाणेसाेबत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. या वेळी त्याला फाॅकनरनेही महत्त्वाची साथ दिली.

नाणेफेक जिंकून मुंबई संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, टीमची निराशाजनक सुरुवात झाली. संघाची धावसंख्या २४ असताना फिंचला दुखापत झाली. त्याच्या रूपात मुंबईला जबर धक्का बसला. पार्थिव व राेहित बाद झाले. उन्मुक्त चंदही फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवू शकला नाही.

स्मिथची फटकेबाजी
राजस्थान राॅयल्स टीमच्या स्मिथने मुंबईविरुद्ध झंझावाती फलंदाजी केली. त्याने नाबाद ७९ धावांची खेळी केली. त्याने ५३ चेंडूंचा सामना करताना शानदार अर्धशतक ठाेकले. यात अाठ चाैकार व एका षटकाराचा समावेश अाहे. याशिवाय त्याने रहाणेसाेबत दुसऱ्या गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी केली हाेती.

पुढे वाचा, पोलार्डचा झंझावात...