मोहाली - मुंबईच्या 173 धावांचा पाठलाग करण्यात पंजाबच्या संघाला अपयश आले आहे. फलंदाजांबरोबर मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने मुंबईने सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबईने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.
दुस-याच षटकात पंजाबला पहिला धक्का बसला. लसिथ मलिंगाने सेहवागला बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. सेहवागला अवघ्या दोनच धावा करता आल्या. त्यानंतर मॅक्सवेलने काही फटके लगावले पण तोही फार काळ टिकला नाही. सुचितने त्याला बाद केले.
मॅक्सवेल बाद झाल्यानंतर मिलर आणि मुरली विजयने चांगली भागीदारी केली. पण मुरली विजयला मोठी खेळी करता आली नाही. फटकेबाजीच्या प्रयत्नात सीमारेषेवर तो झेलबाद झाला. त्याला भज्जीने बाद केले. त्यानंतर मिलरने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण तोही मलिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. रोहितने त्याला बाद केल. त्यानंतर बेली आणि अक्षर पटेल धावबाद झाले.
त्याआधी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणा-या मुंबईला पार्थिव पटेल आणि लिंडले सिमन्स यांनी चांगली सलामी देत एकही विकेट न गमावता शतकी भागीदारी करून दिली. दोघांनीही अर्धशतके केली. पण पार्थिव 59 धावांवर बाद झाल्यानंतर धावांची गती मंदावली. सिमेन्सने 71 धावा केल्या पण त्याला फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
लिंडले सिमन्सने पहिल्याच षटकात दोन चौकार खेचत चांगली सुरुवात केली. पार्थिव पटेलने सुरुवातीला काहीसा संथ खेळ केला. पण पंजाबचा मुख्य गोलंदाज मिशेल जॉन्सन गोलंदाजीला येताच तो तुटून पडला. त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 1 षटकार आणि 2 चौकार खेचत त्याचा आत्मविश्वास संपवला. त्यानंतरही त्याने फटकेबाजी सुरुच ठेवली. अर्धशतकानंतर फटकेबाजीच्या प्रयत्नात 59 धावांवर पार्थिव बाद झाला. तो बाद झाल्यानंतर मुंबईची धावांची गतीही मंदावली. रोहित शर्मालाही फारशी फटकेबाजी करता आली नाही. सिमन्स 71 धावांवर बाद झाला. पण त्याला मोठे फटके लगावता आले नाही. पोलार्डही अखेरच्या 12 चेंडूंसाठी मैदानात उतरला पण त्यालाही सात धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईला 172 धावांवर समाधान मानावे लागले.
मुंबई व पंजाब दोन्ही संघ सध्या आयपीएलत्या गुणतक्त्यात तळाच्या स्थानी आहे. मुंबई सातव्या तर पंजाब आठव्या स्थानी आहे. त्यामुळे स्पर्धेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक असणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्टा करणार हे नक्की.
पंजाबसाठी आनंदाची बाब म्हणजे त्यांचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल संघात परतला आहे. त्याचप्रमाणे मिशेल जॉन्सनही संघात परतला आहे. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही बाबतीत संघाला काहीशी बळकटी मिळाली आहे.
ओव्हर टू ओव्हर स्टेटस्
किंग्ज इलेव्हन पंजाब
20 - 7 बाद 149 (विकेट सहा धावबाद विनय कुमार)
19 - 6 बाद 140 , (विकेट बेली 21 धावबाद पटेल )(विकेट अक्षर पटेल 0 धावबाद मलिंगा)
18 - 4 बाद 129
17 - 4 बाद 124 (विकेट मिलर 43, झेल रोहित, गो. मलिंगा)
16 - 3 बाद 118
15 - 3 बाद 113
14 - 3 बाद 105, 1 चौकार
13 - 3 बाद 97
12 - 3 बाद 90, 1 चौकार, (विकेट मुरली विजय 39, झेल चंद, गो. हरभजन)
11 - 2 बाद 82, 1 षटकार
10 - 2 बाद 73
9 - 2 बाद 69, 1 षटकार
8 - 2 बाद 58, 1 चौकार
7 - 2 बाद 50
6 - 2 बाद 45
5 - 2 बाद 42 , चौकार , (विकेट मॅक्सवेल 12, झेल विनय कुमार, गो सुचित)
4 - 1 बाद 33, 1 चौकार
3 - 1 बाद 28, 2 चौकार
2 - 1 बाद 16 , 1 चौकार, (विकेट वीरेंद्र सेहवाग 2, झेल पोलार्ड गो. मलिंगा)
1 - बिनबा1द 9, 1 चौकार
---------------------------------
मुंबई इंडियन्स
20 - 3 बाद 172 , 1 चौकार (विकेट सिमेनस 71, झेल अक्षर, गो. अनुरीत )
19 - 2 बाद 163 , 1 चौकार
18 - 2 बाद 154, 1 चौकार (विकेट रोहित शर्मा 26 झेल अनुरीत, गो. जॉन्सन)
17 - 1 बाद 146, 1 चौकार
16 - 1 बाद 136, 1 षटकार
15 - 1 बाद 123
14 - 1 बाद 118
13 - 1 बाद 115, 1 चौकार, (विकेट पार्थिव पटेल-59 झेल विजय गो. करनवीर)
12 - बिनबाद 110, 1 षटकार
11 - बिनबाद 102, पार्थिव पटेलचे अर्धशतक
10 - बिनबाद 96, 2 चौकार
9 - बिनबाद 84, 2 चौकार
8 - बिनबाद 72, 1 षटकार, 1 चौकार
7 - बिनबाद 60
6 - बिनबाद 51
5 - बिनबाद 46, 1 षटकार, 2 चौकार
4 - बिनबाद 28, 1 चौकार
3 - बिनबाद 22, 1 चौकार
2 - बिनबाद 16, 1 चौकार
1 - बिनबाद 9 धावा, 2 चौकार
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचे PHOTO