आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ipl Mumbai Need Rajasthan To Lost Their Both Remaining Matches

मुंबई प्लेऑफच्या शर्यतीत; सलग तिसरा विजय; दिल्लीचा 15 धावांनी पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- यजमान मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर विजयाची हॅट्ट्रिक करत आयपीएल-7 च्या प्लेऑफ प्रवेशाच्या आशा कायम ठेवल्या. मुंबई इंडियन्सने शुक्रवारी वानखेडेवर पाहुण्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 15 धावांनी पराभव केला. मुंबईने सलग तिसरा सामना जिंकून आयपीएलमध्ये विजयाचा षटकार मारला. या विजयाच्या बळावर मुंबईने 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर धडक मारली.

सामनावीर मायकेल हसीच्या (56) अर्धशतकापाठोपाठ र्मचंट डी लेंगेच्या (2/32) धारदार गोलंदाजीच्या बळावर मुंबईने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 19.3 षटकांत 173 धावा काढल्या. प्रत्युत्तरात दिल्ली डेअरडेव्हिल्सला चार गड्यांच्या मोबदल्यात 158 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीचा आयपीएलमधील हा 11 वा पराभव ठरला. धावांचा पाठलाग करणार्‍या दिल्लीकडून केविन पीटरसन 44, जेपी डुमिनी नाबाद 45 आणि मनोज तिवारीने केलेली 41 धावांची व्यर्थ ठरली. जेपी डुमिनी आणि मनोज तिवारीने 54 चेंडूंमध्ये तब्बल 85 धावांची केलेली भागीदारी या वेळी व्यर्थ ठरली.

तत्पूर्वी, हसी व सिमन्सने मुंबईच्या डावाची सुरुवात केली. मुंबईने पहिल्या षटकापासून धावगती चांगली राखली होती. जवळपास प्रत्येक षटकामध्ये एखाद-दुसरा चौकार मारत पाचव्या षटकात 54 धावा केल्या होत्या. हीच धावगती आठव्या षटकापर्यंत राखत पहिली विकेट पडली.

माधव मंत्री यांना श्रद्धांजली
सामना सुरू होण्यापूर्वी दोन मिनिटे शांतता राखून माजी कसोटीपटू माधव मंत्री यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जमलेल्या सर्व मुंबईकर क्रिकेटप्रेमींनी शांतपणे उभे राहून माधव मंत्री यांना श्रद्धांजली वाहिली.

हसी फॉर्मात
मुंबई इंडियन्सचा मायकेल हसी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे . त्याने दुसर्‍या अर्धशतकासह मुंबईच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. त्याने सामन्यात 33 चेंडूंत सात चौकार व दोन षटकारांसह 56 धावांची खेळी केली.

हसीचे अर्धशतक
धावा 56
चेंडू 33
षटकार 02
चौकार 07