आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल-7 : यंदा हसी, क्रिस गेलच्या कामगिरीकडे असेल लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल-6 मध्ये हसीने सर्वाधिक 733 धावा आणि दुसर्‍या स्थानी असलेल्या गेलने 708 धावा काढल्या. वाढत्या वयातही अद्याप या फॉरमॅटमध्ये दोघांची कामगिरी ही अनेक युवा खेळाडूंसाठी आव्हानात्मक आहे.

यंदा हसी हा मुंबई इंडियन्सकडून आणि गेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमककडून खेळणार आहे. या दोघांशिवाय विविध टीममधील एकूण 23 खेळाडू हे 32 पेक्षा अधिक वयाचे आहेत. प्रवीण तांबे हा (42) सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्याने गतवर्षी राजस्थान रॉयल्ससाठी अनेक सामन्यांत मॅचविनरची कामगिरी केली आहे. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरनदेखील 41 वर्षांचा आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचे प्रतिनिधित्व करत आहे.

धोनी 32 वर्षांपेक्षा अधिक
महेंद्रसिंग धोनी, बी. मॅक्लुम, एस.बद्री, मिथुन मिन्हास (सर्व चेन्नई), केविन पीटरसन (दिल्ली), सेहवाग, मुरली कार्तिक, मिशेल जॉन्सन, एल. बालाजी (किंग्ज इलेव्हन), गौतम गंभीर, रियान टेन, कॅलिस (केकेआर), जहीर, मायकेल हसी, हरभजन (मुंबई), रजत भाटिया, बॅ्रड हॉज, प्रवीण तांबे, वॉटसन (राजस्थान), क्रिस गेल, ए. मोर्कल, युवराजसिंग, मुरलीधरन (बंगळुरू) हे 32 वर्षांपेक्षा अधिक आहेत.

मायकेल हसी सर्वात पुढे
गतवर्षी चेन्नई सुपरकिंग्जकडून 17 सामन्यांत 733 धावा (6 अर्धशतके) काढणारा हसी यंदा मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याने गतवर्षी 95 धावांची सर्वोत्कृष्ट खेळी केली होती. टीमचा आधारस्तंभ असलेल्या हसीला मात्र चेन्नईने कायम ठेवले नाही. वयाचा खेळण्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही, हे हसीने मागील सत्रात सर्वाधिक धावा काढून सिद्ध केले.

गेलसमोर सर्वच फेल
वेस्ट इंडीजच्या क्रिस गेलने आयपीएल-6 मध्ये 708 धावा काढल्या. तसेच पाचव्या सत्रात 733 धावांची खेळी केली होती. गतवर्षी त्याने पुणे वॉरियर्सविरुद्ध नाबाद 175 धावा काढल्या होत्या. त्याची ही खेळी सत्रातील सर्वोत्कृष्ट ठरली. गेल हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. पॉवर हिटर गेलने आतापर्यंत 205 चौकार आणि 180 षटकार ठोकले आहेत.