आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल : आता होणार 3 एप्रिलपासून चौकार, षटकारांचा पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल-6 मधील संघ
इंडियन प्रीमिअर लीगच्या सहाव्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. दोन एप्रिल रोजी रंगारंग उद्घाटनानंतर 3 एप्रिलपासून सामन्यांना सुरुवात होईल. ही स्पर्धा 26 मेपर्यंत चालेल. स्पर्धेचा उद्घाटन आणि समारोप कोलकत्यात होईल. स्पर्धेत सहभागी होणा-या संघांची ताकद, दुबळेस्थान, शक्यता आदींची हा लेखाजोखा.
कोलकता नाइट रायडर्स कोरबो, लोरबो, जितबो रे
मालक । नाइट रायडर्स स्पोर्ट्स प्रा.ली. कर्णधार । गौतम गंभीर
कोच । ट्रेवर बेलिस. श्रेष्ठ प्रदर्शन । 2012 मध्ये चॅम्पियन

शक्तिस्थान
* ब्रेंडन मॅक्लुम, जॅक कॅलिस, गौतम गंभीर, मनोज तिवारी यांची फलंदाजी
* सुनील नारायण, सकिब-अल-हसन यांची फिरकी गोलंदाजी
* जेम्स पॅटिंसनची वेगवान गोलंदाजी
दुबळी बाजू
* तळाचे फलंदाज अपयशी
* वेगवान गोलंदाजांत सातत्याचा अभाव
* स्लॉग ओव्हरमध्ये पराभवाचे रेकॉर्ड
या वेळी यांच्याकडून आहे आशा
युसूफ पठाण- मागच्या दोन सत्रात अपयशी ठरणा-या या जिगरबाद आॅलराऊंडरकडून चौकार, षटकारांच्या आतषबाजीसह बळी घेण्याची आशा आहे.
ब्रेट ली- रनअप शानदार. चेंडू वेगवानसुद्धा असतात मात्र विकेट मिळत नाही. या वेळी मॅचविनर ठरण्याची आशा.
आर. मॅक्लारेन- संघातील नवा चेहरा. मधल्या फळीत आक्रमक फलंदाज आणि मीडियम पेसर.
कशी असेल कामगिरी- टॉप-4 मध्ये येण्याची शक्यता आहे. टीम गतविजेता असल्याने हे लक्षात ठेवून चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल.
चेन्नई सुपरकिंग्स
धोनी ब्रिगेडचा जलवा
मालक । द इंडिया सिमेंटस् लिमिटेड कर्णधार । महेंद्रसिंग धोनी
कोच । स्टिफन फ्लेमिंग श्रेष्ठ प्रदर्शन । 2010, 2011 चॅम्पियन

शक्तिस्थान
* महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा सारखे मॅच विनर खेळाडू संघात.
* एल्बी मोर्केल स्लॉग ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यात माहीर.
* आर. अश्विन, जकाती प्रभावी.
दुबळी बाजू
* द. आफ्रिकेचा एल्बी मोर्केल अपयशी ठरल्यास स्थिती नियंत्रणात आणणारा एकही वेगवान गोलंदाज संघाकडे नाही.
या वेळी असेल आकर्षण
1. बाबा अपराजित- (अंडर 19 वर्ल्डकप विजेता संघाचा सदस्य), देशांतर्गंत क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी.
2. धनंजय- श्रीलंकेचा डावखूरा फिरकीपटू
कशी असेल कामगिरी- धोनीच्या कुशल नेतृत्वाखाली दोन वेळेस टीम चॅम्पियन ठरली आहे. या वेळी सुद्धा किताब जिंकण्याची शक्यता आहे. संघाकडे अनेक मॅचविनर आहेत. रवींद्र जडेजा, अश्विनची जोडी कसोटीप्रमाणे येथेही कमाल करू शकते.
नाइट रायडर्स
विदेशी: ब्रेंडन मॅक्लुम, जॅक कॅलिस, ब्रेड हॅडिन,
ब्रेट ली, जेम्स पॅटिंसन, इयान मोर्गन, सुनील नारायण, आर. मॅक्लारेन, एस. सेनानायके, सकिब-उल-हसन,
रेयान डेन डोश्चेट.
देशी: गौतम गंभीर (कर्णधार), मनविंदर बिसला, युसूफ पठाण, रजत भाटीया, लक्ष्मीपथी बालाजी, इक्बाल अब्दुल्ला, प्रदीप सांगवान, सरबेजित लढ्ढा, मनोज तिवारी, लक्ष्मीरतन शुक्ला, शमी अहेमद, देवव्रत दास.
चेन्नई सुपर किंग्स
विदेशी: फॉफ डु प्लेसिस, एल्बी मोर्केल, क्रिस मॉरिस, माईक हसी, बेन हिल्फेनहॉस, बेन लॉफिन, डर्क नानेस, डेवेन ब्राव्हो, धनंजय, जे. होल्डर, नुवान कुलशेखरा.
देशी: महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मुरली विजय, एस. बद्रीनाथ, वृद्धिमान साहा, एस. जकाती, मोहित शर्मा, बाबा अपराजित, विजय शंकर, आर. मोर, आर. कार्तिकेयन.