आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Scam: Sourav Ganguly Joins Justice Mukul Mudgal Probe Panel

‘दादा’ करणार स्पॉट फिक्सिंगची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व ‘दादा’ सौरव गांगुली आता आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगची चौकशी करणार आहे. या स्पर्धेतील चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्या. मुद्गल समितीवर गांगुलीची निवड झाली आहे. या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती मुकुल मुद्गल यांच्यासह तिघांचा समावेश आहे. ‘भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला आम्ही समितीमध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती. या वेळी त्याने विनंती मान्य केली ’ असेही मुद्गल यांनी सांगितले.