आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Season 7 News In Marathi, Ranjib Biswal, IPL Chairman, Divya Marathi

आयपीएलचे 70 टक्के सामने होणार भारतातच - रणजीब बिस्वाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयपीएल हा देशांतर्गत होणारा क्रीडा प्रकार असल्याने आयपीएल-7 चे साधारण 60 ते 70 टक्के सामने भारतातच होतील, उर्वरित काही सामने बाहेर खेळवले जातील, असे आयपीएलचे चेअरमन रणजीब बिस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बीसीसीआयने घेतलेल्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. या बैठकीला अध्यक्ष एन. श्रीनिवासन, राजीव शुक्ला, संजय पटेल, सुंदररामन, बिस्वाल उपस्थित होते.