आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Season 8 Auction Tomorrow Yuvraj Singh Will Be Key Player

IPL-8 साठी खेळाडूंचा उद्या लिलाव, युवराजसह कित्‍येक दिग्‍गजांवर असेल लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्‍या आठव्‍या पर्वासाठी उद्या (सोमवार) खेळाडूंचा लिलाव होणार आहे. लिलावामध्‍ये सर्वांच्‍या नजरा युवराज सिंह आणि हाशिम आमला या दिग्‍गजावर लागल्‍या आहेत.
(फाइल फोटो - युवराजसिंग)
उल्‍लेखनिय म्‍हणजे युवराज गतवर्षीचा सर्वांत महागडा खेळाडू होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मालक विजय माल्‍याने त्‍याला 14 कोटी रुपयांमध्‍ये खरेदी केले होते. विश्‍वचषकात निवड झाली नसली तरी त्‍याच्‍यावर मोठी बोली लागू शकते. कारण रणजी सामन्‍यात त्‍याचे उत्‍कृष्‍ठ प्रदर्शन राहिले आहे.
हाशिम आमलाने शास्‍त्रशुध्‍द फलंदाजीचा नमुना दाखवत 2014 मध्‍ये कित्‍येक वेगवान खेळी साकारल्‍या आहेत. ऑस्‍ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंचवसुध्‍दा मोठी बोली लागू शकते. कारण विश्‍वचषकाच्‍या सुरुवातीच्‍याच सामन्‍याध्‍ये त्‍याने शतकी पारी खेळली. याशिवाय केविन पीटरसन, दिनेश कार्तिक, महेला जयवर्धने, इयान मोर्गन, कुमार संगकारा, मुरली विजय, डेरेन सॅमी, अँजेलो मॅथ्यूज, एरन फिंच, एलेक्स हेल्‍स आदींवर मोठी बोली लावली जावू शकते.
122 खेळाडू राखी
नेहमीप्रमाणे यावर्षीही लिलावाचा होस्टिंग रिचर्ड मेडले करणार आहेत. आयपीएल-8 चे पर्व 8 एप्रिल 2015 पासून सुरु होणार आहे. 122 क्रिकेटपटूंना वेगळ्या वेगळ्या संघांनी या पर्वासाठीही राखीव ठेवले आहे. म्‍हणजे राखीव खेळाडूंवर बोली लावली जाणार नाही. यामध्‍ये 78 खेळाडू भारतीय आणि 44 विदेशी खेळाडू आहेत.