आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Session Seven: Yuvi, Sahewag And Other 31 Players Get Two Crore

आयपीएल पर्व सात: युवी, सेहवागसह 31 खेळाडूंच्या लिलावाचे आधार मूल्य दोन कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सातव्या पर्वाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या पर्वात आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणासाठी सज्ज असलेल्या 10 देशांतील 233 खेळाडूंची सूची जाहीर करण्यात आली असून भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि युवराजसिंग यांची बोली प्रक्रियेसाठीचे आधार मूल्य सुमारे 2 कोटी रुपये निर्धारित करण्यात आले आहे. आयपीएल 2014 साठी खेळाडूंचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूत केला जाणार आहे. विशेष म्हणजे या वर्षी सर्व खेळाडूंची खरेदी भारतीय चलनात केली जाईल.
विदेशी खेळाडूंचा बोलबाला
आयपीएल-7 च्या पर्वात अ‍ॅशेसमध्ये शानदार प्रदर्शन करणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनला सर्वाधिक आधार मूल्य मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॅडिन आणि स्टीव्हन स्मिथ यांचाही यात समावेश आहे. याव्यतिरिक्त आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला द. आफ्रिकेचा कॅलिस, श्रीलंकेचा मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉज यांनादेखील एक ते दीड कोटींपर्यंत आधार मूल्य मिळाले आहे.
अँडरसन, हेल्सवर मोठी बोली लागणार : न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज कोरी अँडरसन आणि अ‍ॅलेक्स हेल्स सध्या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये खो-याने धावा ओढत आहेत. त्यामुळे आयपीएलच्या फ्रँचायझींची त्यांच्यावर करडी नजर राहणार आहे. आयपीएलमध्ये तगडी रक्कम मिळाली तरच हेल्सला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाईल, असे काउंटी क्रिकेट टीम नॉटिंघमशायरकडून सांगण्यात आले.
यांचा खेळण्यास नकार
कुमार संगकारा, दिनेश चांदिमल (श्रीलंका), मायकल क्लार्क, मिशेल मार्श (ऑस्ट्रेलिया), बेन स्टोक्स, जोस बटलर आणि स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड), केमार रोच (वेस्ट इंडीज)
लिलावासाठी आधार मूल्य प्राप्त खेळाडू
भारत : वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, प्रज्ञान ओझा, भुवनेश्वर कुमार, प्रवीण कुमार, अमित मिश्रा, आशिष नेहरा, युसूफ पठाण, मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा, मुरली विजय.
दोन कोटी
विदेशी : जॉर्ज बेली, ब्रॅड हॅडिन, ब्रॅड हॉज, माइक हसी, मिशेल जॉन्सन, ब्रेट ली, शॉन मार्श, जेस पॅटिन्सन, स्टीव्हन स्मिथ, मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), अ‍ॅलेक्स हेल्स, समित पटेल, केविन पीटरसन (इंग्लंड), ब्रॅडन मॅक्लुम, रॉस टेलर (न्यूझीलंड), जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका), तिलकरत्ने दिलशान, माहेला जयवर्धने, अँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका), एम. सॅम्युएल्स (वेस्ट इंडीज).
1.5 कोटी
एस. बद्रीनाथ, मनप्रीत गोनी, अशोक डिंडा, मुरली कार्तिक, जहीर खान, पार्थिव पटेल, वृद्धिमान साहा, मोहंमद शमी, आर.पी. सिंग, मोहित शर्मा, जयदेव उनादकट.
50 लाख
परविंदर अवाना, लक्ष्मीपती बालाजी, पीयूष चावला, अभिमन्यू मिथुन, नमन ओझा, मुनाफ पटेल, राहुल शर्मा, सौरभ तिवारी.
30 लाख
वसीम जाफर, अभिनव मुकुंद, अभिषेक नायर, रमेश पोवार, वेणुगोपाल राव, जोगिंदर शर्मा, पंकज सिंह, संदीप त्यागी, फवाद अहमद आणि पीनल शाह.
रक्कम रुपयांत