आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Shahrukh Khan And Cheerleaders Cricket Or Business

क्रिकेटेन्‍मेंट : बॉलिवूड, क्रिकेट, पैसा आणि ग्‍लॅमरचे डेडली कॉकटेल म्‍हणजेच IPL

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौतम गंभीरच्‍या चौकार-षटकारांवर नाचणारा बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान. प्रत्‍येक चौकारावर आपले लटके-झटके दाखवणा-या पाश्चिमात्‍य कपडयातील चिअरलीडर्स. सगळीकडे नुसता गोंधळ, जसं काही क्रिकेटची मॅच नसून सर्कसच सुरू आहे. असा नजारा पाहिल्‍यानंतर फक्‍त एकच नाव डोळयासमोर येते ते म्‍हणजे IPL.

क्रिकेटमधील सर्वात लहान प्रकार असलेल्‍या टी-20ला ग्‍लॅमरचा तडका लावून 2008 साली जेव्‍हा IPL ची सुरूवात झाली. तेव्‍हा जगभरातील क्रिकेट प्रेमींना एंटरटेनमेंटची अनोखी भेटच मिळाली.

या टुर्नामेंटमध्‍ये सामन्‍याच्‍या निर्णयासाठी वनडेप्रमाणे दिवसभर वाट पाहण्‍याची गरज नाही. कसोटी क्रिकेटमधील पांढ-या कपडयातील आपल्‍या आवडत्‍या क्रिकेटपटूला ओळखण्‍याची कसरत करावी लागत नाही. चौकार आणि षटकारांच्‍या रोमांचने ठासून भरलेल्‍या टी-20 क्रिकेटला बॉलिवूडचाही मुलामा लावण्‍यात आलेला आहे.

एक वेळ अशी होती की विदेशी क्रिकेटपटू भारतात येण्‍यास टाळायचे. लिजेंड क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन जेव्‍हा भारताच्‍या दौ-यावर आले होते. तेव्‍हा त्‍यांनी आपल्‍या जहाजातच बसणे पसंत केले होते. त्‍यांना भारताच्‍या जमिनीवर उतरायची इच्‍छा नव्‍हती. आणि आता आयपीएलमधील पैशाने जगभरातील खेळाडूंना मोहून टाकले आहे. आता तर आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील प्रत्‍येक खेळाडू आयपीएलचा हि‍स्‍सा बनण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे.

जेथे ग्‍लॅमर आणि पैसा यांचे कॉकटेल होते. तेव्‍हा तिथे वाद होणे हे नैसर्गिकच आहे. आयपीएलच्‍या मागील पाच सत्रांमध्‍ये अनेक छोटे-मोठे वाद झाले. काहींनी पडद्याआड राहून खेळालाच उघडे केले. तर काहीं जणांना यापायी सत्तेच्‍या सारीपाटावरून उतरावे लागले होते.

अशावेळी प्रश्‍न समोर येतो, तो म्‍हणजे आयपीएल आहे तरी काय ? हे क्रिकेट आहे ? का बिझनेस आहे ? का निव्‍वळ एंटरटेनमेंट आहे ?

www.divyamarathi.com ने आयपीएलच्‍या या तीन मुद्यांचे अ‍ॅनालिसिस केल्‍यानंतर ही एक टुर्नामेंट नसून क्रिकेटन्‍मेंट, म्‍हणजेच क्रिकेट आणि एंटरटेनमेंटचा परफेक्‍ट मिक्‍स.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या आयपीएलने चेंडू आणि बॅटच्‍या या खेळाला कसे दिले क्रिकेटेनमेंटचे रूप...