आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Spot Fixing: Chandiala, Srisant, Chavan Today Gets Punishment?

आयपीएल स्पॉट फिक्सिंग: चंडिला, श्रीसंत, चव्हाण यांना आज होणार शिक्षा ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अँटिकरप्शन युनिटचे प्रमुख रवी सवानी यांच्या आयपीएल मॅच फिक्सिंग अहवालावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी नवी दिल्ली येथे बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. एस. श्रीसंत, अजित चंडिला, अंकित चव्हाण या राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंचे भवितव्य उद्या या अहवालातील संशोधनावर निश्चित होणार आहे. अहवालातील निष्कर्षानंतर दोषी खेळाडूंना किमान पाच वर्षे बंदीची शिक्षा होऊ शकते. गुन्हा कबूल केल्यास आजीवन बंदीही येऊ शकेल, असा अंदाज आहे.


बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीमध्ये अध्यक्ष एन. श्रीनिवासन, उपाध्यक्ष अरुण जेटली, निरंजन शहा यांचा समावेश आहे. रवी सवानी यांनी गेल्या महिन्यांत कोलकाता येथे झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ‘आयपीएल मॅच फिक्सिंग’ अहवाल सादर केला होता. तो अहवाल आता बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीपुढे ठेवण्यात येणार आहे. सवानी यांनी सादर केलेल्या हंगामी अहवालात चंडिलाला वगळण्यात आले होते. कारण चंडिला याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. 6 आॅगस्ट रोजी दोन दिवसांसाठी चंडिलाला मुक्त करण्यात आले होते. त्या वेळी चंडिलाने आपल्यावरील आरोपांचे खंडन केले होते. श्रीसंत व चव्हाण या दोन खेळाडूंनीही आपण निर्दोष असल्याचे म्हटले होते. या खेळाडूंवर आयपीएलमधील सामन्यात हेतुपुरस्सर खराब कामगिरी केल्याचा आरोप आहे.
* आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर जगमोहन दालमिया यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयने तत्काळ ऑ परेशन क्लीन अप’ अभियान सुरू केले होते.
* आयपीएलमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी दालमिया यांनी त्या वेळी काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते.
त्या निर्णयांपैकी काही प्रमुख निर्णय असे होते.
1) चिअर लीडर्सवर बंदी आणणे.
2) खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांच्यासह होणा-या सामन्यानंतरच्या पार्ट्या बंद करणे.
3) फ्रँचायझींच्या मालक मंडळींच्या ड्रेसिंग रूम आणि ‘डग आऊट’मधील वावरावर निर्बंध आणणे.