आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL FIXING : चेन्नईचे अनेक सामने होते फिक्स- धोनी-रैनाचे नाव पुन्हा पुढे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- क्रिकेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आयपीएलचा सातवा हंगाम महिन्यावर आला आहे. मात्र गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेला फिक्सिंग व बेटिंगचे गालबोट लागले होते. या गालबोटाचे भूत आयपीएलच्या मानगुंटीवर चांगलेच बसले आहे. याबाबत सांगितले जात आहे की, आयपीएल-6 मध्ये चेन्नई सुपरकिंग्जचे एक-दोन नव्हे तर तब्बल निम्म्यापेक्षा जास्त सामने फिक्स असल्याचे पुढे येत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन आणि विंदू दारा सिंह यांच्यातील टेलिफोनिक चर्चेतून ही माहिती पुढे येत आहे. याबाबत आणखी एक माहिती उपलब्ध झाली आहे ती म्हणजे बुकींच्या सांगण्यावरून मयप्पन धोनी आणि रैनाच्या संपर्कात राहत होता.
सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुरुनाथ मयप्पन आणि विंदू दारा सिंह यांच्या फोन कॉल्स डिटेल्सचे वॉयस सॅंपल तपासली आहेत. ज्यामुळे हे सिद्ध होत आहे क, मयप्पन आणि विंदू दोघे मिळून मॅच फिक्स करीत होते. आयपीएल-6 मधील 12 ते 15 मे दरम्यान झालेल्या सर्व सामन्यांची माहिती विंदू दारा सिंहला मयप्पनच्या माध्यमातून मिळत होते. पुराव्यानुसार हे सिद्ध होत आहे की, मयप्पनकडून विंदूकडे आणि विंदूकडून बुकींकडे ही माहिती जात होती. त्यानंतर ते सट्टेबाजी करीत असत.
विंदू तयार करायचा रणनिती- मयप्पन चेन्नईचा टीम प्रिंसिपल होता. सूत्रांच्या माहितीनुसार तो विंदूशी प्रत्येक बाब शेअर करायचा. सामने सुरु होण्यापूर्वी मयप्पन विंदूला माहिती पुरवत असे. तीच माहिती विंदू पुढे सट्टेबाजांकडे देत असे त्यावर रणनिती ठरवून बुकी पैसे लावायचे. मयप्पन जेवढा म्हणेल तेवढाच स्कोर व्हायचा किंवा एक-दोन धावा मागेपुढे व्हायच्या. 12 ते 15 मे दरम्यान हे सामने झाले होते. पोलिसांकडे या कालावधीतील व्हाईस सॅंपल उपलब्ध आहे.