आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Spot Fixing: Dhoni Offers To Quit As CSK Captain

FIXING: आरोपाने धोनी व्यथित, चेन्नई सुपर किंग्जचा राजीनामा देण्याची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकणात सुप्रीम कोर्टात आरोप झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. इंडिया सिमेंट उपाध्यक्षपदाचाही राजीनामा देण्याची त्याने इच्छा व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर बीसीसीआय अध्यक्षपद सोडलेले आणि इंडिया सिमेंटचे मालक एन. श्रीनिवासन यांना धोनीने शुक्रवारी फोन करुन हा प्रस्ताव मांडला. सुत्रांच्या माहितीनुसार धोनीच्या प्रस्तावावर अजून विचार सुरु असून तो स्विकारण्यात आलेला नाही. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या धोनी बांगलादेशात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करीत आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.
आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोप झाल्याने धोनी व्यथित झाला आहे. फिक्सिंगच्या चौकशीसाठी नेमलेल्या मुकूल मुदगल समितीने धोनीवर खोटे बोलल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान बीसीसीआयचे वकील सी.ए. सुंदरम यांनी धोनीचा बचाव केला. मुदगल समितीने त्याच्यावर लावलेल्या आरोपात सत्यता नसल्याचे त्यांनी सांगितले. मुदगल समितीच्या चौकशी अहवालावरच सुनावणी सुरु असून पुढील सुनावणी 16 एप्रिलला आहे. न्या. ए.के. पटनायक आणि न्या. एफ. एम. इब्राहिम कलीफुल्ला यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी पीठाने धोनीचे बॉस एन. श्रीनिवासन यांची गच्छंती करुन त्यांच्या जागेवर सुनील गावसकर यांना बीसीसीआयचे अध्यक्ष नेमले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, धोनीला प्रतिमा जपायची आहे