आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील गावसकर \'बीसीसीआय\'चे हंगामी अध्यक्ष, \'आयपीएल\'ला हिरवा कंदिल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे सध्या वादात सापडलेल्या इंडियन प्रिमियर लिगचे (आयपीएल) सातव्या हंगामातील सामने रद्द केले जाणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) सांगितले. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. गावसकर यांनी काल अध्यक्षपद भूषविण्यास अनुकूलता दर्शविली होती.
16 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये भाग घेण्यास कोणत्याही खेळाडूवर बंदी घातली जाणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष एन. श्रीनिवास यांच्या जागी सुनील गावसकर यांची नियुक्ती करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
माजी क्रिकेटपटूला अध्यक्षपद भूषविण्याची संधी देण्यासंदर्भात बीसीसीआयच्या घटनेत तरतूद नसल्याचे काल बीसीसीआयने सांगितले होते.
आयपीएल 2013 मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंगमध्ये श्रीनिवासन यांचे जावाई गुरुनाथ मयप्पन यांच्या सहभागाचा निःपक्ष तपास करण्यासाठी श्रीनिवासन यांनी पायउतार व्हावे आणि सुनिल गावसकर यांना हंगामी अध्यक्ष करावे, असे न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी सुचविले होते. यावर निर्णय घेण्यासाठी श्रीनिवासन यांना दोन दिवसांचा अवधी देण्यात आला होता. परंतु, राजीनामा देणार नाही, अशी कडक भूमीका श्रीनिवासन यांनी घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने स्वतः निर्णय घेतला आहे.
सुनील गावसकर यांचे करिअर आणि वैयक्तिक माहिती पुढील स्लाईडवर...