आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - आयपीएल-6 मधील स्पॉट फिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरणात सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी आपला निकाल देणार आहे. हरियाणा व पंजाबचे माजी न्यायमूर्ती मुकुल मुद्गल यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र तपास समिती नेमली होती.
स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण मे 2013 मध्ये उजेडात आले. यात क्रिकेटपटू श्रीसंत, अजित चंडीला व अंकित चव्हाण यांना अटक झाली होती. यानंतर गुरुनाथ मयप्पन, विंदू दारासिंग व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांचीही चौकशी करण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.