आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी राज कुंद्रा यांना क्लिनचिट; इंडिया सिमेंटविरुद्धही सापडले नाहीत पुरावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राजस्थान रॉयल्स संघाचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना आज (रविवार) क्लिनचिट दिली.

चेन्नई सुपर किंग्जची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट या कंपनीविरुद्धही बीसीसीआयला कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे बीसीसीआयने इंडिया सिमेंटलाही आरोपातून मुक्त केले आहे.

यासंदर्भात बीसीसीआयचे उपाध्यक्ष निरंजन शाह म्हणाले, की राज कुंद्रा यांचा संघ राजस्थान रॉयल्स आणि इंडिया सिमेंट या कंपनीविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत. हा अहवाल आयपीएल नियामक समितीला पाठविला जाणार आहे. यावर २ ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय घेतला जाईल.