आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Spot Fixings After Probe Report Indicts Gurunath Meiyappan

IPL स्पॉट फि‍क्सिंग: आयपीएल सट्टेबाजीचा मयप्पनच गुरू!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन आयपीएलमध्ये सट्टेबाजी करत होताच. शिवाय, संघांची गुप्त माहिती सट्टेबाजांना देत होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार स्थापन न्या. मुद्गल चौकशी समितीच्या अहवालात हे सत्य बाहेर आले. अहवाल सोमवारी कोर्टात दाखल झाला. राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा याच्या भूमिकेबद्दल नव्याने चौकशीची शिफारस त्यात आहे. मयप्पन व कुंद्रा या दोघांनाही क्रिकेट मंडळाने क्लीन चिट दिली होती.

..तर चेन्नई-राजस्थानची आयपीएलमधून सुट्टी

26 मे 2013 : बोर्डाचा खोटारडेपणा
मयप्पनचा चेन्नई संघाशी संबंध नाही. फक्त क्रिकेट प्रेमापोटी ते आयपीएलदरम्यान संघासोबत राहतात.
- एन.श्रीनिवासन, बीसीसीआय अध्यक्ष

10 फेब्रु. 2014 : चौकशीतील सत्य
मयप्पनचे चेन्नईशी अधिकारी म्हणून संबंध होते. क्रिकेटप्रेमी नव्हे, संघाचे तेच सर्वेसर्वा असल्याचे पुरावे आहेत. -न्या. मुकुल मुद्गल, चौकशी समिती

>बोर्ड अध्यक्षांचा जावई मयप्पनवर सट्टेबाजीचा आरोप अहवालात सिद्ध
>शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राही अडकला संशयाच्या फेर्‍यात

धोनीची चौकशी व्हावी : मोदी
आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींनी चेन्नईचे विजय रद्द करा, बक्षिसे परत घेण्याची मागणी केली. धोनीचीही चौकशी व्हावी, त्याचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असे मोदी म्हणाले. मयप्पन यांचे संघाशी काही देणेघेणे नाही, असे धोनी म्हणाला होता.

खेळाडूंच्या खात्यांवर नजर ठेवावी
0मॅचनंतरच्या पाटर्य़ांवर बंदी आणली जावी.
0 बोर्डाची खेळाडूंच्या बँक खात्यांपर्यंत पोहोच असावी.
0हॉटेलमधील खेळाडूंच्या खोल्यांमध्ये कुटुंबीयांशिवाय इतरांना प्रवेश नको
0खेळाडूंना फक्त बोर्डाने दिलेला फोनच घेऊन जाण्याची परवानगी असावी.

012 फेब्रुवारीला होणार्‍या आयपीएल-7साठी 500 खेळाडूंच्या लिलावावर बंदी नाही. 07 मार्चला सुप्रीम कोर्ट समितीच्या अहवालावर सुनावणी करणार.

परिणाम
0 समितीचा रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला तर चेन्नई व राजस्थानच्या संघांना आयपीएलमधून बाहेर पडावे लागेल.
शक्यता
0 समितीने बंद लिफाफ्यात काही नावांची यादी कोर्टाला दिली. सुनावणीत अनेक ‘बड्या खेळाडूं’ची नावे समोर येऊ शकतात.
संधी
0 फिक्सिंग थांबवण्यासाठी बोर्डाने निवृत्त लष्करी व पोलिस अधिकार्‍यांची भरती करावी. फिक्सिंगविरुद्ध सचिन, गांगुली, द्रविड आदींची मदत घ्यावी.

एक्स्पर्ट व्ह्यू-
विरोधकच नसल्याने श्रीनिंची खुर्ची शाबूत
-अयाझ मेमन- क्रीडा विश्लेषक

बहुमताच्या दांडगाईपुढे नैतिकतेचा काय पाड? जावईबापू मयप्पन सट्टेबाजीत अडकल्यानंतर र्शीनिवासन यांच्या राजीनाम्याच्या मागणीत जोर नव्हताच. नैतिकतेच्या नावावर ते स्वत: पदावरून दूर झाले व परतलेही. यानंतर त्यांनी जावयाला बीसीसीआयकडून क्लीन चिटही मिळवून दिली. त्यानंतर सर्वोच्च् न्यायालय समितीच्या अहवालात आला असून जावई मयप्पन यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तरीही र्शीनिवासन निश्चिंत आहेत. कारण त्यांना कुणीच विरोधक नाही. दुसरीकडे आयसीसी बोर्डाच्या अध्यक्षपदी र्शीनिवासन यांची नियुक्ती झाली आहे. येथेही तगडा विरोधक नसल्यांने त्यांची खुर्ची सुरक्षित आहे.