आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : सुनील नारायण यशस्वी गोलंदाज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - वेस्ट इंडीजचा सुनील नारायण आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघात सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने यंदाच्या सत्रात केकेआरकडून सर्वाधिक 14 विकेट घेतल्या. तसेच त्याने आतापर्यंत केकेआरकडून 22 सामने खेळताना 38 बळी घेतले आहेत. त्याचे हे कोलकाता संघातील सर्वाधिक बळी ठरले. आयपीएल-6 मध्ये त्याने सात सामन्यांत आतापर्यंत एकूण 28 षटके टाकली. यामध्ये त्याने 11.35 च्या सरासरीने एकूण 159 धावा देत 14 बळी घेतले. यासह त्याने अव्वल स्थान गाठले. दुस-या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसंघाचा विनयकुमार आहे. त्याने आठ सामन्यांत एकूण 13 बळी घेतले आहेत.

रोहित शर्माने रैनाला टाकले मागे
मुंबई इंडियन्स संघाच्या रोहित शर्माने आयपीएलमध्ये झेल घेण्याच्या कामगिरीत सुरेश रैनाला मागे टाकले. त्याचे 85 सामन्यांत एकूण 45 झेल झाले आहेत. सुरेश रैनाचे 88 सामन्यांत 44 झेल आहेत. रोहितने आयपीएल-6 मध्ये बुधवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध सामन्यात कॅलिसचा झेल घेतला. यासह त्याने 45 झेल पूर्ण करून रैनाला मागे टाकले. यापूर्वी दोघांचेही 44 झेल होते. याचबरोबर सर्वाधिक 45 झेल घेणारा रोहित शर्मा आयपीएलमधील टॉप खेळाडू ठरला. यासह आयपीएल-6 मध्ये मुंबई इंडियन्स टीमचा यशस्वी फलंदाज ठरला आहे. सात सामन्यात त्याच्या एकुण 268 धावा झाल्या आहेत. मुंबई संघाकडुन त्याच्या या सर्वाधिक धावा आहेत. यामध्ये त्याच्या तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 9 एप्रिलला दिल्लीविरुद्ध सामन्यात नाबाद 74 धावा काढल्या होत्या. तसेच पुणे वॉरिसर्यविरुद्ध 13 एप्रिलला नाबाद 62 धावा ठोकल्या होत्या. 21 एप्रिलला त्याने (73) दिल्लीविरुद्ध दुसरे अर्धशतक ठोकले.