आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा, कोलकाता ३५ धावांनी विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता - गाैतम गंभीरच्या काेलकाता नाइट रायडर्स संघाने अाठव्या सत्राच्या अायपीएल क्रिकेट स्पर्धेत पाचव्या विजयाची नाेंद केली. यजमान संघाने सनरायझर्स हैदराबादचा धावांत १३२ धावांत धुव्वा उडवला. उमेश यादव (२/३४) व हाॅगच्या (२/१७) धारदार गाेलंदाजीच्या बळावर काेलकात्याने ३५ धावांनी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना काेलकाताने ७ बाद १६७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात हैदराबादला १३२ धावा काढता अाल्या. हेनरिक्स (४१) व कर्ण शर्माने (३२) झुंज दिली. मात्र, त्यांना संघाचा पराभव टाळता अाला नाही. तत्पूर्वी राॅबिन उथप्पा (३०) व गाैतम गंभीरने (३१) काेलकाता नाइट रायडर्सला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. यासह त्यांनी संघाला
दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर ईश्वर पांडेने ३३ अाणि युसूफ पठाणने नाबाद ३० धावांची खेळी केली. गाेलंदाजीत कर्ण शर्मा व भुवनेश्वरने प्रत्येकी दाेन गडी बाद केले.