आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल : सनरायझर्स- पुणे वॉरियर्स आज मुकाबला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - इंडियन प्रीमिअर लीगची नवी टीम सनरायझर्स हैदराबाद यंदाच्या सत्रात विजयी सुरुवात करण्याच्या इराद्यानेच शुक्रवारी मैदानावर उतरेल. सनरायझर्स समोर पुणे वॉरियर्सचे तगडे आव्हान असेल. ही लढत राजीव गांधी इंटरनॅशन स्टेडियम, उप्पलवर होईल. सनरायजर्सचे नेतृत्व श्रीलंकेचा कुमार संगकारा करीत असून, पुण्याचा कर्णधार श्रीलंकेचाच अँग्लो मॅथ्यूजकडे आहे.
सनरायझर्सला डेक्कन चार्जर्सच्या जागी आयपीएलमध्ये सामील करण्यात आले आहे. टीमचे बहुतेक खेळाडू डेक्कन चार्जर्सचेच आहेत. कुमार संगकाराच्या नेतृत्वाखाली सनरायझर्सची टीम बर्‍यापैकी संतुलित दिसून येत आहे.
दुबळी बाजू : कुमार संगकारा, पार्थिव पटेल आणि कॅमरुन व्हाइटशिवाय फलंदाजांत एकही मोठे नाव नाही. याचा फटका संघाला बसू शकतो.
पुणे फलंदाजी यंदा मजबूत : अ‍ॅरोन फिंच, युवराजसिंग, अँग्लो मॅथ्यूज, ल्यूक राइट आदी खेळाडू झटपट फलंदाजी करण्यात तरबेज आहेत.
अष्टपैलूंची संख्या अधिक : संघाकडे युवराजसिंग, अँग्लॉ मॅथ्यूज, ल्यूक राइट, अभिषेक नायर, टी. सुमन, स्टिवन स्मिथ सारखे दहापेक्षा अधिक आॅलराउंडर आहेत.
पुण्याची दुबळी बाजू : वेगवान गोलंदाजांत एकही मोठा खेळाडू पुण्याकडे नाही. फलंदाजीत युवराजसिंगच्या दर्जाचा दुसरा खेळाडू नाही. या सामन्यात महाराष्ट्राच्या धीरज जाधवला संधी मिळू शकते.