आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: सुपरकिंग्जचा विराट दणका, यंदाच्या सत्रात सातवा विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाैकार खेचताना चेन्नईचा रैना.
चेन्नई - महेंद्रसिंग धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने अाठव्या सत्राच्या अायपीएल क्रिकेट स्पर्धेत सप्तरंगी विजय संपादन केला. यजमान चेन्नईने साेमवारी विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूवर १९.४ षटकांत राेमहर्षक विजयाची नाेंद केली. चेन्नईने २४ धावांनी सामना जिंकला.
अाशिष नेहरा (३/१९), ईश्वर पांडे (२/२८) अाणि डॅवेन ब्राव्हाे (२/१७) यांनी धारदार गाेलंदाजी करून चेन्नईला सुपर विजय मिळवून दिला.
सामनावीर सुरेश रैना (५२), फाफ डुप्लेसिस (२४) अाणि धाेनीच्या (२९) झंझावाती खेळीच्या बळावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या बंगळुरूसमाेर विजयासाठी १४९ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाने १२४ धावांत सुपरकिंग्जसमाेर लाेटांगण घातले.
बंगळुरूकडून विराट काेहलीने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. अावाक्यातल्या अाव्हानाचा पाठलाग करणा-या बंगळुरूची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर मॅडीनसन (४) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर डिव्हिलर्स (२१) अाणि मनदीप सिंग भाेपळा न फाेडताच तंबूत परतला.कोहलीने एकाकी झंुज देत ४८ धावा काढल्या. बंगळुरूचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले.

नेहराचे तीन बळी: चेन्नईच्या अाशिष नेहराने बंगळुरूविरुद्ध चार षटकांत १९ धावा देत तीन बळी घेतले. अाता त्याच्या नावे एकूण १७ विकेट झाल्या अाहेत. तसेच पांडे अाणि ब्राव्हाेने प्रत्येकी दाेन गडी बाद केले.

रैनामुळे दमछाक
सुरेश रैनाने बंगळुरूच्या गाेलंदाजांची दमछाक केली. त्याने ४६ चेंडूंत ५ चाैकार व एका षटकाराच्या अाधारे ५२ धावा काढल्या. याशिवाय त्याने डुप्लेसिससाेबत ६४ धावांची भागीदारी करून संघाला माेठी धावसंख्या उभी करून दिली. बंगळुरूला हे लक्ष्य गाठता अाले नाही.