आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 7:दिल्लीविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा शानदार विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - सामनावीर करुण नायरच्या (73) नाबाद अर्धशतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल-7 मध्ये विजय मिळवला. राजस्थानने शनिवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 7 गड्यांनी पराभव केला. राजस्थानचा हा चौथा विजय ठरला.

प्रथम फलंदाजी करत दिल्लीने 5 बाद 152 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने तीन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.

तत्पूर्वी क्विंटन डिकॉक (43) व मुरली विजयने (13) दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, विजयला फ्युकरनने झेलबाद केले. केविन पीटरसनने सलामीवीर डिकॉकसोबत दुस-या गड्यासाठी 36 धावांची भागीदारी केली. डिकॉकने 33 चेंडूंचा सामना करत 42 धावा काढल्या. केदार जाधवने नाबाद 28, जेपी डुमिनीने 39 आणि दिनेश कार्तिकने 12 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली : 5 बाद 152 धावा; राजस्थान : 3 बाद 156 धावा.

पुढे वाचा....