IPL: गाैतम गंभीर-लीनचा / IPL: गाैतम गंभीर-लीनचा झंझावात; कोलकात्याकडून गुजरात लायन्सची शिकार

दिव्य मराठी वेब टिम

Apr 08,2017 09:35:00 AM IST
राजकाेट - दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता नाइट रायडर्सने दहाव्या सत्राच्या इंडियन प्रिमीयर लीगमध्ये धडाकेबाज विजय संपादन केला. काेलकाता टीमने शुक्रवारी अापल्या पहिल्या सामन्यात सुरेश रैनाच्या गुजरात लाॅयन्सचा पराभव केला. काेलकात्याने १० गड्यांनी सामना जिंकला.

कर्णधार गाैतम गंभीर (नाबाद ७६) अाणि क्रिस लीनने (नाबाद ९३)) अापल्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर काेलकाता टीमला विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना गुजरातच्या टीमने ४ बाद १८३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात काेलकाता नाइट रायडर्सने १४.५ षटकात विजयश्री खेचून अाणली. प्रत्युत्तरात कर्णधार गाैतम गंभीर व लीनने झंझावाती फलंदाजी केली. त्यामुळे काेलकात्याने सहज विजय मिळवला. यासह काेलकात्याने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून काेलकात्याच्या गाैतम गंभीरने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अापल्या कर्णधार गंभीरचा हा निर्णय पीयूष चावलाने सार्थकी लावला.त्याने सलामीवीर जेसन राॅयला (१४) झटपट बाद केले. यासह त्याने यजमान गुजरातच्या टीमला जबर धक्का दिला. मात्र, कर्णधार सुरेश रैनाने संघाचा डाव सावरला. त्याने सलामीच्या मॅक्लुमसाेबत दुसऱ्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी केली. दरम्यान, मॅक्लुमने ३५ धावांचे याेगदान दिले. रैनाने दिनेश कार्तिकसाेबत चाैथ्या गड्यासाठी ८७ धावांची माेठी भागीदारी करून गुजरातच्या धावसंख्येचा अालेख उंचावला.
गाैतम गंभीर-क्रिस लीनची फटकेबाजी
काेलकाता नाइट रायडर्सच्या गाैतम गंभीर अाणि लीनने गुजरातच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना तुफानी फटकेबाजी केली. त्यांनी अभेद्य भागीदारी रचून संघाचा विजय निश्चित केला. गंभीरने ४८ चेंडूंचा सामना करताना १२ चाैकारांच्या अाधारे नाबाद ७६ धावा काढल्या. लीनने ४१ चेंडूंत ६ चाैकार अाणि ८ षटकारांच्या अाधारे नाबाद ९३ धावांची खेळी केली.
केकेअारचा एेतिहािसक विजय
काेलकाता टीमने एकही विकेट न गमावता अायपीएलमध्ये एेतिहासिक विजय मिळवला. यापूर्वीचा असा विक्रम बिग बॅशमध्ये अाॅस्ट्रेलियाच्या पर्थ स्काेेरचर्सच्या नावे हाेता. या टीमने २०१५ मध्ये मेलबर्नवर अशी मात केली हाेती.
कुलदीपचे दाेन बळी
काेलकात्याचा कुलदीप यादव सामन्यात चमकला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना दाेन विकेट घेतल्या. त्याने चार षटकांत २५ धावा देताना २ बळी घेतले. याशिवाय बाेल्ट अाणि पीयूष चावलाने प्रत्येकी एक बळी घेतला.
प्लेइंग इलेवनः
गुजरात लायन्स- ड्वेन स्मिथ, ब्रेंडन मॅक्कुलम, जेसन रॉय, सुरेश रैना (कर्णधार), एरोन फिंच, दिनेश कार्तिक, मनप्रीत गोनी, प्रवीण कुमार, शादाब जकाती, धवल कुलकर्णी आणि शिविल कौशिक.

कोलकाता नाइटराइडर्स- गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, क्रिस लिन, यूसुफ पठान, सूर्यकांत यादव, क्रिस वोक्स, पीयूष चावला, कुलदीप यादव, सुनील नारायण आणि ट्रेंट बोल्ट.
पुढील स्लाईडवर पाहा मॅचचे फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
X
COMMENT