आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ipl Tamasha Gambhir Kohli Fight Delhi Cricketer Insulted

IPL तमाशा: दिल्लीत चेतन चौहान यांचा आयपीएलच्या अधिकार्‍याकडून अवमान!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी अधिकारी दिलीप वेंगसरकर यांना स्टेडिअमच्या गेटवरूनच परत पाठवल्याचे प्रकरण ताजे असताना आता तसेच प्रकरण दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडिअमवर शुक्रवारी घडले. डीडीसीएचे मैदान आणि खेळपट्टी समितीचे अध्यक्ष व माजी कसोटीपटू चेतन चौहान यांना आयपीएलच्या अधिकार्‍याने खेळपट्टीवर जाण्यास मज्जाव करून त्यांचा अवमान केला.

आज सायंकाळी कोटला मैदानावर दिल्ली आणि हैदराबाद याच्यात लढत होत आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर फिरोजशाह कोटला मैदानावर चेतन चौहान खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी गेले होते. परंतु आयपीएलचे अधिकारी पीटर ग्रिफिथ यांनी तेथे जाण्यापासून रोखले.

मैदानात प्रवेश करण्‍यासाठी चौहान यांना एक्रिडेशन कार्ड देण्यात आले होते. त्यात केवळ स्टेडिअममध्ये प्रवेश करण्‍याची परवानगी होती. परंतु खेळपट्टीवर जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती असे आयपीएलकडून स्पष्टीकरण देण्यात आले.

परंतु चौहान खेळपट्टीवर जाण्याच्या मुद्‍द्यावर अडून बसल्यानंतर जीएमआर ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी आणि पूर्व भारतीय क्रिकेटपटू सुनील विल्सन यांनी त्यांना प्रवेश पत्र देणारे अधिकारी सुंदर राजन यांच्याशी बोलण्याचा सल्ला देऊन टाकला. त्यामुळे चौहान अधिकच भडकले.

सुंदर राजन आणि पीटर ग्रिफिथ हे कोण आहेत? यांना मी ओळखत नाही. माझ्याच स्टेडिअमच्या खेळपट्टीवर जाण्यास मला परवानगी घ्यावी लागत असल्याचेही चौहान म्हणाले. चौहान यांचा अवमान झाल्याचे पाहून स्टेडिअमवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी काम बंद केले आहे.