आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉयल्सची धुरा वॉटसनकडे; राहुल द्रविड संघाचा मेंटर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (2014) ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असेल. माजी कर्णधार राहुल द्रविड मेंटरच्या भूमिकेत काम करणार आहे.

राजस्थान रॉयल्सचे रघू अय्यर यांनी सोमवारी ही घोषणा केली. वॉटसन पहिल्या आयपीएलपासूनच राजस्थानचा सदस्य आहे. रॉयल्सने 2008 मध्ये या स्पध्रेचे विजेतेपद पटकावले होते. त्या वेळी वॉटसन (472 धावा, 17 विकेट) मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरला होता.

‘राजस्थान रॉयल्स शानदार टीम आहे. संघाने मला नेहमी चांगली कामगिरी करण्याची संधी दिली. शेन वॉर्न आणि राहुल द्रविड या दोघांनी माझ्यावर विश्वास टाकला. 2008 प्रमाणे यश मिळवण्याचे माझे प्रयत्न असेल,’ अशी प्रतिक्रिया शेन वॉटसनने व्यक्त केली.

माजी कर्णधार राहुल द्रविड संघाची रणनीती ठरवताना युवा खेळाडूंना प्रेरित करण्याचे काम मेंटर म्हणून करेल. त्याने नवनियुक्त कर्णधार वॉटसनचे अभिनंदन केले. ‘वॉटसन फक्त शानदार अष्टपैलू खेळाडू नसून तो उत्तम क्रिकेटपटू आहे. खेळाडू आणि स्टाफची त्याला चांगली ओळख आहे. वॉटसनच्या नेतृत्वात रॉयल्स या वेळी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास आहे,’ असे द्रविडने म्हटले.