आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल-7 : विराट, रोहित, रैना झंझावातासाठी सज्ज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियातील तीन स्टार विराट कोहली, सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांनी नुकत्याच बांगलादेशात झालेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी केली. हे तिघेही आता आयपीएल-7 मध्ये झंझावाती फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

विराट कोहली
2013 च्या आयपीएल सत्रात 16 सामन्यांत एकूण 634 धावा काढणारा 25 वर्षीय कोहली चाहत्यांच्या हृदयातील ताईत बनला. कसोटीपाठोपाठ वनडे आणि आता टी-20 क्रिकेटमध्येही तो यशस्वी ठरला आहे.
विराटची शैली : आक्रमक खेळीने सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. यामुळेच त्याची तुलना सध्या व्हिव्हियन रिचर्ड्स आणि सचिन तेंडुलकरशी केली जात आहे. तो एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. तसेच पार्टटाइमला गोलंदाज म्हणूनही तो चांगली कामगिरी करतो.

रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 97 आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने 2513 धावा काढल्या आहेत. यामध्ये एका शतकासह 18 अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहितचे वैशिष्ट्य : ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात रोहितने द्विशतक झळकावले होते. यापूर्वी तीन आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सचे प्रतिनिधित्व करताना चांगली कामगिरी केली. 2011 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये रोहित सहभागी झाला.

सुरेश रैना
28 वर्षीय सुरेश रैनाने चेन्नई सुपरकिंग्जसाठी अनेकदा महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. त्याने गत सहाव्या सत्रात एकूण 18 सामन्यांत चेन्नईचे प्रतिनिधित्व केले. यात त्याने एकूण 548 धावा काढल्या.
रैनाचे सामन्यांचे ‘शतक’! रैनाला 3 हजार धावांसाठी अवघ्या 198 ची आवश्यकता आहे. यासह तो तीन हजार धावांचा पल्ला गाठणारा पहिला खेळाडू ठरेल. रैना 18 एप्रिल रोजी किंग्ज इलेव्हनविरुद्ध लढतीत सामन्यांचे ‘शतक’ही पूर्ण करणार आहे.