आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL7 Live Match Mumbai T20 V Kolkata T20 At Abu Dhabi In Marathi

गतविजेत्या मुंबईचा पहिल्या सामन्यात पराभव; कोलकाता 41 धावांनी विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारजाह - गतविजेत्या मुंबई इंडियन्सची आयपीएल-7 मध्ये चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाइट रायडर्सकडून 41 धावांनी पराभव झाला. सामनावीर ज्ॉक कॅलिस, मनीष पांडे व फिरकीपटू सुनील नरेन नाइट रायडर्सच्या विजयाचे शिल्पकार ठरले. कोलकाताने 5 बाद 163 धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला 7 बाद 122 धावाच काढता आल्या.

विजयासाठी आवश्यक असलेल्या 164 धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून अंबाती रायडूने 40 चेंडूंत सर्वाधिक 48 धावा काढल्या.

कर्णधार रोहित शर्माने 27 आणि आदित्य तारेने 24 धावांचे योगदान दिले. या तिघांशिवाय मुंबईच्या इतर फलंदाजांना दोनअंकी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. मायकेल हसी (3), पोलार्ड (6*), कोरी अंडरसन (2), सी. गौतम (7) यांचे अपयश मुंबईला भोवले. केकेआरकडून फिरकीपटू सुनील नरेनने 20 धावांत 4 गडी बाद केले.

तत्पूर्वी, कॅलिस (72) आणि मनीष पांडे (64) यांच्या अर्धशतकांच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 163 धावा काढल्या. ज्ॉक कॅलिस व मनिष पांडे यांनी 131 धावांची शतकी भागीदारी करून केकेआरला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.

मलिंगाच्या 4 विकेट
अवघ्या 4 धावांवर गंभीर बाद झाल्यानंतर 16 व्या षटकापर्यंत मुंबईचे गोलंदाज विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करीत होते. 17 व्या षटकात मलिंगाने पांडेला (64) त्रिफळाचीत केले. जहीरने रॉबिन उथप्पाला (1) रोहितकरवी झेलबाद केले. यानंतर मलिंगाने आपल्या चौथ्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर कॅलिसला (72) अँडरसनकरवी झेलबाद केले. याच षटकाच्या सहाव्या चेंडूवर त्याने सकिब-अल-हसनचा (1) अडथळा दूर करून 4 विकेट पूर्ण केल्या.

गंभीर अपयशी
बुधवारी येथे शेख जाएद स्टेडियमवर कोलकाताचा कर्णधार टॉस जिंकण्यात तर यशस्वी झाला, मात्र फलंदाजीत तो सपशेल अपयशी ठरला. गंभीरला मुंबईचा स्टार गोलंदाज लेसिथ मलिंगाने अप्रतिम यॉर्करवर त्रिफळाचीत केले. यानंतर कॅलिसने मनीष पांडेसोबत कोलकाताला संकटातून बाहेर काढले. दोघांनी 79 चेंडूंत 100 धावांची भागीदारी केली. कॅलिसने 46 चेंडूंत 3 षटकर, 6 चौकारांसह 72 तर मनीष पांडेने 53 चेंडूंत 64 धावा काढल्या.


पुढील स्लाइड्‍सवर पाहा, आयपीएलच्या रंगारंग कार्यक्रमाचे फोटोज्