आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL8 Rohit Sharma Happy With Balanced Mumbai Indians Squad

आयपीएल आव्हानावर लक्ष केंद्रित : रोहित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय संघाला विश्वचषक राखता न आल्याने संघातील सर्वच क्रिकेटपटू निराश झाले होते. मात्र, आता आयपीएलमुळे नवीन आव्हान सामोरे आले असून त्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे मुंबई इंडियन्सचा कप्तान रोहित शर्मा याने सांगितले.

मुंबई इंडियन्स संघाचे संपूर्ण लक्ष आता केवळ आयपीएलच्या आठव्या सीझनवर केंद्रित केले आहे. त्यामुळे आता विश्वचषकातील पराभवाचे शल्य विसरून आयपीएलचे विजेतेपद कसे पटकावता येईल, त्यावरच लक्ष केंद्रित करणार असल्याचेही रोहितने नमूद केले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार महिने राहून काहीसा थकला होता. मात्र, त्यानंतरच्या या सुटीत पुन्हा ताजेतवाने होऊन खेळाडू दोन महिन्यांच्या आयपीएलमध्ये सहभागी होत आहेत. २०१३ चे विजेते असलेले मुंबई इंडियन्स पहिल्याच सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सशी ८ एप्रिलला लढेल.

आयपीएलसाठी मी पूर्णपणे सज्ज
आयपीएलचे वेळापत्रक आधीच तयार करण्यात आले असल्याने त्यासाठी मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्यादेखील सज्ज आहे. एक खेळाडू म्हणून प्रत्येक स्पर्धेत शंभर टक्के योगदान देण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न असतो. त्यामुळे कोणताही खेळाडू थकल्याने कमी परफॉर्म करेल असे मला वाटत नाही,असेही रोहित म्हणाला.

सर्वोत्तम खेळ करू
केकेआरकडे गोलंदाजांची चांगली फौज आहे. तसेच ते विद्यमान चॅम्पियनदेखील असल्याने आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. पहिलाच सामना असल्याने दोन्ही संघांवर दडपण असेल. सामना ईडन गार्डनवर होणार असून घरच्या मैदानावर केकेआरचा खेळ नेहमीच बहरतो. त्यांच्या गोलंदाजीला आमचे फलंदाज चांगले उत्तर देतील, असा विश्वासदेखील राेहितने व्यक्त केला.

शाब्दिक चकमक खेळाचा भाग : पाँटिंग
सामन्यादरम्यान खेळपट्टीवर होणारी शाब्दिक चकमक हा खेळाचाच भाग असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान आणि मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग याने व्यक्त केले आहे. मात्र हे द्वंद्व विशिष्ट मर्यादेतच असावे.खेळाडूंनी या चकमकीत कुठे थांबायचे ते स्वत:च ठरवायचे असते. तेच मी आमच्या खेळाडूंना सांगणार असल्याचे पाँटिंगने म्हटले आहे.