आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकी बॉइजने पटकावला अल्तमश फुटबॉल चषक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अल्तमश ग्रुपतर्फे आयोजित रात्र फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इराकी बॉइज संघाने एनयूएफसी संघाला अटीतटीच्या लढतीत 2-1 ने पराभूत करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. एनयूएफसी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
विजेत्या संघाला प्रथम क्रमांकाचे 11 हजार अकराशे रुपये व चषक, तर उपविजेत्या संघाला 5 हजार पाचशे पंचावन्न रुपये व चषक राष्टÑवादीचे सय्यद अब्दुल कदरी मौलाना यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी विनोद पाटील, आयोजक सय्यद ओसामा, अहेमद अल अत्तास यांची उपस्थिती होती. अंतिम सामन्यात इराकी बॉइज- एनयूएफसी यांच्यात जोरदार संघर्षपूर्ण लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघ उत्कृष्ट असल्याने शेवटपर्यंत सामन्यात प्रेक्षकांना रोमांच अनुभवायला मिळाला.
एनयूएफसी संघातर्फे पहिल्या हाफमध्ये नबील शेखने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. दुसºया हाफ मध्ये इराकीच्या मुस्तफाने संघाचा पहिला गोल करून सामना बरोबरीत आणला. एनयूएफसीच्या खेळाडूंनी दुसºया सत्रात आक्रमक खेळ न करता बचावाचा पवित्रा घेतल्याने त्यांचे नुकसान झाले आणि इराकीतर्फे ऐहाबने दुसरा गोल डागत संघाला आघाडी मिळवून दिली. या आघाडीवर इराकी संघाने 2-1 च्या फरकाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.