आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - तामिळनाडूचा सलामीवीर मुरली विजयने 116 धावांची शानदार खेळी करून टीम इंडियाच्या सलामीसाठी आपली मजबूत दावेदारी सिद्ध केली. त्याच्या या खेळीमुळे पाचदिवसीय इराणी करंडकात रणजी चॅम्पियन मुंबईविरुद्ध शेष भारत संघाने पहिल्या दिवसअखेर 5 बाद 330 धावा काढल्या.
कर्णधार वीरेंद्र सेहवागचे पोट बिघडल्याने मुरली विजयला ऐनवेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. सेहवागच्या जागी हरभजनसिंगकडे शेष भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मुरली विजयने दिल्लीच्या शिखर धवनसह (63) पहिल्या विकेटसाठी 38 षटकांत 144 धावांची मजबूत सलामी दिली. विजयने 206 चेंडूंचा सामना करताना 17 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 116 धावा काढल्या. विजय तिस-या विकेटच्या रूपाने बाद झाला त्यावेळी शेष भारताच्या 231 धावा झाल्या होत्या. मनोज तिवारीने 37, अंबाती रायडूने 51 आणि सुरेश रैनाने नाबाद 36 धावा काढल्या. रायडूने आपल्या खेळीदरम्यान प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पाच हजार धावासुद्धा पूर्ण केल्या.
मुंबईकडून अभिषेक नायरने 19 षटकांत 49 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केले. मुंबईचा स्टार परफॉरमर वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला फक्त एकच विकेट घेता आली.शेष भारताकडून शतकी सलामी देणारे मुरली विजय-शिखर धवन. दोघांनी 144 धावांची भागीदारी करताना मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.