आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irani Cup : Shesh India\'s First Session End 526 Runs

इराणी करंडक : शेष भारताचा पहिला डाव 526 धावांवर गुंडाळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वसीम जाफरच्या 80 आणि अजिंक्य रहाणेच्या नाबाद 55 धावांच्या खेळीच्या बळावर रणजी विजेता मुंबईने पहिल्या डावात 2 बाद 155 धावा काढून इराणी करंडकात चांगली सुरुवात केली. यापूर्वी शेष भारताचा पहिला डाव 526 धावांवर आटोपला. शेष भारताकडून सुरेश रैनाने शानदार 134 धावा काढल्या. तळाचा फलंदाज अभिमन्यू मिथुनने 51 धावांचे योगदान दिले.

वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईची टीम पहिल्या डावात अजून 371 धावांनी मागे आहे. सलामीवीर आदित्य तारे अवघ्या 6 धावा काढून मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेचा बळी ठरला. यानंतर जाफर आणि रहाणे यांनी दुस-या विकेटसाठी 132 धावांची मजबूत भागीदारी केली. दिवसाच्या अखेरच्या षटकात जाफरला श्रीसंतने यष्टिरक्षक अंबाती रायडूकरवी झेलबाद केले. जाफरने 126 चेंडूंचा सामना करताना 80 धावा काढल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि एक षटकार मारला. रहाणेने 108 चेंडूंचा सामना करताना 8 चौकारांच्या साहाय्याने नाबाद 55 धावा जोडल्या. तो अजूनही खेळपट्टीवर कायम आहे. त्याच्यासोबत शार्दूल ठाकूर चार धावा काढून नाबाद आहे.

यापूर्वी शेष भारताने कालच्या 5 बाद 330 धावांवरून पुढे ख्ोळण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला डाव 130.1 षटकांत 526 धावांत आटोपला. रैनाने 169 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार आणि 5 षटकार ठोकताना शानदार 134 धावा काढल्या. त्याच्या शतकामुळे शेष भारताची टीम मोठा स्कोअर उभा करू शकली. रैना आणि मिथुन यांनी सातव्या विकेटसाठी 153 धावांची भागीदारी करून मुंबईला अडचणीत आणले. मुंबईकडून डावखुरा फिरकीपटू अंकित चव्हाणने 10.1 षटकांत 56 धावांत 3 गडी बाद केले. धवल कुलकर्णीने 27 षटकांत 107 धावा मोजत दोन गडी टिपले. अभिषेक नायरने 25 षटकांत 70 धावा देत 2 विकेट घेतल्या. ठाकूर आणि दाभोळकर यांनी प्रत्येकी एकाला बाद केले.

जाफरच्या खेळीने डाव सावरला
मुंबईकडून भरवशाचा फलंदाज वसीम जाफरने 80 धावांची खेळी केली. त्याचा जोडीदार आदित्या तारे लवकर बाद झाल्यानंतर जाफरने मैदानावर टिकून खेळताना रहाणेसोबत उपयुक्त शतकी भागीदारी केली.

शेष भारत धावा चेंडू 4 6
(कालच्या 5 बाद 330 धावांवरून पुढे)
रैना झे. ठाकूर गो. चव्हाण 134 169 14 5
साहा पायचीत गो. धवल 17 19 4 0
हरभजन झे. नायर गो. धवल 16 15 3 0
मिथुन पायचीत गो. चव्हाण 51 90 9 0
ओझा झे.धवल गो. दाभोळकर 0 7 0 0
श्रीसंत नाबाद 1 19 0 0
पांडे झे. रहाणे गो. चव्हाण 13 14 1 1
अवांतर : 27. एकूण : 130.1 षटकांत सर्वबाद 526.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-144, 2-222, 3-231, 4-309, 5-330, 6-352, 7-505, 8-506, 9-512, 10-526. गोलंदाजी : जावेद खान 18-6-45-0, धवल 27-5-107-2, ठाकूर 18-1-82-1, दाभोळकर 26-3-119-1, नायर 25-10-70-2, चव्हाण 13.1-1-56-3, रोहित 6-2-33-1.
मुंबई धावा चेंडू 4 6
जाफर झे. रायडू गो. श्रीसंत 80 126 11 1
तारे झे. तिवारी गो. पांडे 6 9 1 0
अजिंक्य रहाणे नाबाद 55 108 8 0
ठाकूर नाबाद 4 15 1 0
अवांतर : 10. एकूण : 43 षटकांत 2 बाद 155.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-14, 2-146. गोलंदाजी : श्रीसंत 9-3-33-1, ईश्वर पांडे 11-4-33-1, मिथून 9-1-30-0, प्रज्ञान ओझा 7-1-29-0, हरभजनसिंग 7-0-21-0.