आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी मशिदीत झाडू मारायचा इरफान...एका संधीने बदलले आयुष्‍य अन् झाला STAR

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकेकाळी टीम इंडियाचा नियमित सदस्‍य राहिलेला इरफान पठाण पुनरागमनासाठी उत्‍सुक झाला आहे. बेंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्‍ये पूर्णपणे फिट झालेल्‍या इरफानचा आत्‍मविश्‍वास चांगलाच दुणावला आहे.

जूनमध्‍ये झालेल्‍या आयसीसी चॅम्पियन्‍स ट्रॉफीमध्‍ये इरफानचाही टीममध्‍ये समावेश होता. मात्र, एका दुखापतीमुळे त्‍याला वेस्‍ट इंडीज आणि झिम्‍बाब्‍वे दौ-यातून बाहेर व्‍हावे लागले होते. ऑस्‍ट्रेलियाविरूद्ध ऑक्‍टोबरमध्‍ये मायदेशी होणा-या वनडे सिरिज आणि दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी दावेदारी करण्‍यासाठी तो रणजीमध्‍ये चांगली कामगिरी करेल.

इरफान टीम इंडियाचा असा चेहरा आहे, ज्‍याच्‍यामुळे लाखो युवकांना प्रेरणा मिळालेली आहे. एका छोटया खोलीत आपल्‍या कुटुंबियांबरोबर राहणा-या इरफानने क्रिकेटमध्‍ये चमकदार कामगिरी करून आलीशान बंगल्‍यात पोहोचला आहे. ऑस्‍ट्रेलिया दौ-यापासून करिअरला सुरूवात करणा-या इरफानने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये 10 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने आम्‍ही तुम्‍हाला घडवत आहोत त्‍याच्‍या इथंपर्यंतच्‍या प्रवासाची सफर.