आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irfan Pathan To Replace Vinay Kumar For Sri Lanka Series ‎

श्रीलंका दौरा : विनयकुमारच्या जागी इरफान पठाणची निवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - स्टार गोलंदाज इरफान पठाणला आगामी श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघामध्ये सहभागी होण्याचा गोल्डन चान्स शुक्रवारी मिळाला. वनडे मालिकेच्या पूर्वतयारीसाठी सुरू असलेल्या सरावादरम्यान विनयकुमारला गंभीर दुखापत झाली. त्याला यासाठी तीन आठवड्यांच्या विश्रांतीची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे तत्काळ संघाबाहेर असलेल्या इरफानची निवड करण्यात आली आहे. येत्या 21 जुलैपासून भारत व श्रीलंका यांच्यातील वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.
श्रीलंका दौर्‍यासाठी घोषित करण्यात आलेल्या संघामध्ये इरफान व युसूफ या दोन्ही पठाण बंधूंना स्थान देण्यात आले नव्हते. मात्र, विनयच्या मांसपेशीतील दुखापतीने इरफानच्या संघातील प्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. विनयला तंदुरुस्त होण्यासाठी तीन आठवडे लागणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपाठोपाठ भारतीय संघाला टी-20 विश्वचषक खेळवावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विनयच्या विर्शांतीचा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. दुसरीकडे इरफानला मालिकेमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
श्रीलंकेविरुद्ध 21 जुलै रोजी होणार पहिला सामना