आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: दुसर्‍यांदा आई बनणार शकीरा?; पप्पा गेरार्डला मिळाणार आनंदाची बातमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका कार्यक्रमादरम्यान शकिरा आणि पती गेरार्ड पिक सोबत
बार्सिलोना - फीफा विश्वचषकात पहिल्याच फेरीत बाद होण्याचे दुःख पचवू न शकणारा स्पेनचा खेळाडू गेरार्डला एका महिन्याच्या आतच आनंदाची बातमी मिळणार आहे. एका इंग्रजी न्यूज वेबसाईटनुसार, त्याची पत्नी आणि पॉप सिंगर शकीरा प्रेग्नंट आहे. शकीरा दोन वर्षाच्या आत दुसर्‍यांदा आई बनणार आहे. यापूर्वी गेरार्ड पिक आणि शकीराला एक मुलगा झाला होता. त्याचे नाव मिलान असे आहे.

कुटुंबियांनी केले वृत्ताचे समर्थन
फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, शकीराच्या नातेवाईकांनी तिच्या दुसर्‍यांदा आई होण्याच्या बातमीचे समर्थन केले आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शकीरा प्रेग्नंट आहे. शकीरा आणि गेरार्ड यांना दुसरे आपत्य हवे आहे. या जोडीला पहिल्यांदा 2013 मध्ये मिलान हा मुलगा झाला होता. मात्र याबाबत गेरार्ड पिक आणि शकीरा यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही.
फीफाच्या शेवटच्या कार्यक्रमात दिसली होती शकीरा
शकीरा आणि बार्सिलोनाचा फुटबॉलपटू गेरार्ड पिक यापर्वी ब्राझिलने आयोजित केलेल्या फीफा विश्वचषक सामन्याच्या शेवटच्या कार्यक्रमात दिसले होते. त्यावेळी शकीरा तेथे अंतिम सामन्यानंतर शेवटच्या कार्यक्रमात आपले गाणे "ला ला ला" वर नृत्य करताना दिसली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचा पती गेरार्ड पिक आणि मुलगा मिलानसुध्दा होते.
पुढील स्लाईडवर पाहा, शकीरा आणि गेरार्ड पिक यांचे मिलान सोबतची काही निवडक छायाचित्रे