आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRK च्या हिरोईनला डेट करतोय झहीर खान! युवीच्या लग्नात दिसली केमिस्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान - Divya Marathi
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान
स्पोर्ट्स डेस्क- 38 वर्षाचा माजी क्रिकेटर झहीर खानने अद्याप लग्न केलेले नाही. काय सध्या तो कोणाला डेट करतोय? युवराज सिंगच्या लग्नानंतर पुन्हा एकदा हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. कारण, झहीर गोव्यात युवीच्या लग्नात अॅक्ट्रेस सागरिका घाटगेसोबत दिसला. दोघांत जबरदस्त केमिस्ट्री पाहायलाही मिळाली. त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे की, काय झहीर सागरिकाला डेट करतोय की काय? युवीच्या वेडिंगमध्ये एकत्र काढला फोटो....
- गोव्यात झालेल्या युवराज सिंग आणि हेजल कीच यांच्या लग्नात झहीर खान पोहचला होता.
- या दरम्यान तो अॅक्ट्रेस सागरिका घाटगेसमवेत दिसून आला. दोघांनी युवी-हेजलसमवेत फोटोही काढला.
- तेव्हापासून या दोघांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा सुरु झाली आहे. क्रिकेटर विराट कोहली सुद्धा तेथे गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासमवेत पोहचला होता.
लाईमलाईटपासून दूर सागरिका, शाहरुखसमवेत केलेय काम-
- सागरिका मागील काही काळापासून लाईमलाईटपासून दूर आहे.
- मात्र, झहीरसोबत दिसल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तसेच आणखी एक क्रिकेट-बॉलीवुड कपल बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- सागरिकाने बॉलिवूड अॅक्टर शाहरुख खानसमवेत फिल्म ‘चक दे इंडिया’मध्ये काम केले होते.
- यासाठी सागरिकाला बेस्ट सपोर्टिंग अॅक्सट्रेस अवॉर्ड मिळाला होता.
- चित्रपटात येण्याआधी ती एक खेळाडू होती. सागरिकाने आतापर्यंत 5 हिंदी, एक मराठी आणि एका पंजाबी फिल्ममध्ये काम केले आहे.
- याशिवाय ती अनेक रियलिटी शो आणि फोटोशूट्समध्ये दिसून आली आहे.
- तर, क्रिकेटर झहीर खानने ऑक्टोबर, 2015 मध्ये क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, युवी-हेजलच्या लग्नात झहीर-सागरिकाची कशी दिसली जबरदस्त केमिस्ट्री...
बातम्या आणखी आहेत...