नवी दिल्ली - विश्वचषकापूर्वीच भारतीय संघासमोरील संकट वाढत आहेत. ऑस्ट्रेलियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारताचे वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे अजूनही दुखापतीतून सावरले नाहीत.
भुवनेश्वर कुमार अणि ईशांत शर्मा अजूनही दुखापतीतून सावरले नाहीत. भुवनेश्वर कुमार तसाही ऑस्ट्रेलिया दौ-याच्या पूर्वीपासूनच अनफिट होता.
ईशांतला कसोटी मालिकेमध्ये दुखापत झाली होती. त्यातून तो अद्याप सावरला नाही. या दोन्ही खेळाडूची शेवटी फिटनेस टेस्ट 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानंतर विश्वचषक संघाच्या अंतीम 11 खेळाडूमध्ये कोणाला घ्यावे याचा निर्णय होईल. यांच्या बदल्यात मोहित शर्मा आणि धवल कुलकर्णीला संधी दिल्या जावू शकते.