आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ishant Sharma In For Injured Mohit Sharma For ODI Series Vs West Indies, Latest News In Marathi

टीम इंडियाला ‘विजयी रथावर’ आरुढ करण्‍यासाठी इशांत शर्मा संघात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वेस्ट इंडीज विरुध्‍द पहिला सामना गमावल्‍यानंतर भारतीय क्रिकेट संघाला विजयी रथावर आरुढ करण्‍यासाठी इंशात शर्माला संघात घेतले आहे. मोहित शर्माच्‍या जागी त्‍याची वर्णी लागली आहे.

बीसीसीआयने ट्विटर वर ही माहिती दिली आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 11 ऑक्‍टोबर रोजी नवी दिल्‍ली येथे खेळला जाणार आहे.

उल्लेखनीय म्‍हणजे इशांत शर्मा यावर्षी झालेल्‍या इंग्‍लंड दौ-यावर दुखापतग्रस्‍त झाला होता. इंग्‍लंड दौ-यावर इशांतने तीन कसोटी सामन्‍यात 27.21सरासरीने 14 विकेट घेतल्‍या होत्या.

भारतीय संघाला होणार फायदा
अनुभवी गोलंदाज इशांत शर्माच्‍या सहभागाने भारतीय संघाला फायदा होऊ शकतो. कोच्‍चीमध्‍ये झालेल्‍या पहिल्‍याच एकदिवसीय सामन्‍यात वेस्‍ट इंडिज संघाने 321 धावांचा डोंगर उभा केला होता. त्‍यामध्‍ये मोहित शर्माची चांगलीच धूलाई करण्‍यात आली होती. 9 ओव्‍हरमध्‍ये त्‍याने 61 धावा दिल्‍या होत्‍या.
इशांतचे रेकॉर्ड
इशांत शर्माचे वेस्‍ट इंडिज विरुध्‍दचे एकदिवसीय सामन्‍यातील रेकॉर्ड एवढे उत्‍तम नाही. 2009 ते 2013मध्‍ये खेळलेल्‍या 8 एकदिवसीय सामन्‍यामध्‍ये 8 विकेट मिळविल्‍या आहेत. त्‍याचे उत्कृष्‍ठ प्रदर्शन 30 धावा खर्च करत 2 विकेट आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, रॅ‍किंगमध्‍ये घसरली टीम इंडिया