काेलकाता -
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा अॅथलेटिको डी काेलकाता संघ शनिवारी रात्री पहिल्या सत्रातील इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचा चॅम्पियन ठरला. या विजेत्या संघाचे रविवारी काेलकात्यामध्ये मोठ्या जल्लाेषात स्वागत करण्यात आले. या वेळी रस्त्यावर मोठ्या संख्येत चाहत्यांची गर्दी होती.
मंुबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर सचिनच्या केरला ब्लास्टर्सला नमवून काेलकाता संघाने जेतेपद
आपल्या नावे केले. मोहंमद रफीकने केलेल्या गाेलच्या बळावर काेलकाता संघाने अंतिम सामना आपल्या नावे केला. या वेळी विजेत्या संघावर शुभेच्छांचा वर्षाव पडला. तसेच चाहत्यांनी मोठ्या संख्येत गर्दी करून चॅम्पियन संघाचे उत्साहात स्वागत केले. सांताक्लाॅजच्या वेशभूषेतील चाहत्यांनीही संघाचे स्वागत केले. या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चाहत्यांनी गर्दी केली होती.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून अभिनंदन
सौरव गांगुलीच्या आयएसएल चॅम्प अॅथलेटिकाे डी काेलकाता संघाचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खास अभिनंदन केले. त्यांनी अभिनंदनाचा संदेश पाठवून संघाला आगामी सत्रासाठी शुभेच्छा दिल्या.