(फोटो - लेक सिटी स्टेडियममध्ये उद्घाटनीय सामन्यात कोलकाता संघाचा खेळाडू फिकरू)
कोलकाता - आयपीएलच्या धर्तीवर सुरु झालेल्या फुटबॉल 'इंडियन सुपर लीग' च्या पहिल्याच सामन्यात सौरव गांगुली 'दादा'च्या कोलकाता संघाने विजयी सुरुवात केली आहे. संपूर्ण सामन्यात गांगुलीच्या संघाचीच 'दादागिरी' पाहायला मिळाली.त्यांनी मुंबई सिटी एफसीला 3-0 ने नमवत विजयानेच खाते उघडले आहे. सामन्यामध्ये 27व्या मिनिटाला कोलकाता संघाच्या फिकरु टेफेर्रा लेमेसाने गोल केला.
सेकंड हाफमध्ये 69व्या मिनिटाला बोर्जा फर्नांडेजने गोल करुन कोलकाताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अंतीम क्षणी अर्नाल लिबर्टने कोलकातासाठी गोल करत सामना 3-0 ने खिशात घातला.
प्रियंका चोप्राने वेधले चाहत्यांचे लक्ष
उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड स्टार प्रियंका चोप्रा
आपल्या शानदार संचालन क्षमतेने वातावरण प्रफुल्लित केले. तिने सुरुवातीला शानदार डान्स करून प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर तिने आठही संघांचे मालक आणि सहमालकांसोबत त्या संघांच्या कर्णधारांचा उपस्थितांना परिचय करून दिला. उद्घाटन सोहळ्याचे संचालन सुप्रसिद्ध संगीतकार सलीम मर्चंट यांनी केले. सर्व आठ संघांचे दिग्गज मालक आणि हजारो चाहते सॉल्टलेक स्टेडियमवर उपस्थित होते.
दिग्गजांची उपस्थिती
पश्चिम बंगालच्या मुख्य मंत्री ममता बनर्जी, रिलायंस ग्रुपच्या नीता अंबानी, फुटबॉल फेडरेशनने प्रमुख प्रफुल्ल पटेल, कोलकाता संघाचा मालक सौरव गांगुली , सचिन तेंडुलकर,
रणबीर कपूर ,
जॉन अब्राहम, हृतिक रोशन,
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि
हरभजन सिंग स्टेडियममध्ये उपस्थित होते.
ड्रमर्सने केले मंत्रमुग्ध
कार्यक्रमाच्या वेळी पहिला परफॉर्मन्स ८ फ्रँचायझींच्या ड्रमर्सचा होता. कोलकाता, गोवा, पुणे, दिल्लीच्या ड्रमर्सच्या तालावर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
पुढील स्लाइडवर पाहा, ओपनिंग सेरेमनीची छायाचित्रे...