आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Italian Racer Dies In World Championships Moto Racing

अझरूद्दीनला मुकावे लागले होते तरुण मुलाला, आता गेला आणखी एकाचा जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्‍को- वेगाशी स्‍पर्धा करणे रोमांचक असते. परंतु, यावेळी झालेली एक चूक जीवघेणी ठरू शकते. इटलीचा सुपरबाईक रेसर अँड्रिया अँटोनलीलाही अशाच चुकीमुळे आपला जीव गमवावा लागला. रविवारी मॉस्‍को येथे झालेल्‍या वर्ल्‍ड चॅम्पियनशिपदरम्‍यान झालेली क्रॅश अँटोनलीसाठी घातक ठरली.

अंतिम कॉर्नरवर पोहोचताच अँटोनलीच्‍या बाईकची इतर दोन बाईकशी टक्‍कर झाली. या अपघातात इतर दोन बाइकर्सही गंभीररित्‍या जखमी झाले. या दुर्दैवी अपघातानंतर ही रेस रद्द करण्‍यात आली.

या भीषण अपघाताने 2010मध्‍ये झालेल्‍या एक दुख:द घटनेची आठवण झाली. प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्‍मद अझरूद्दीनचा मुलगा अयाजचा मृत्‍यूही या वेगाच्‍या वेडापायीच झाला होता. सुपरबाईकचा चाहता असलेला अयाज स्‍टंट करून दाखवताना त्‍याचा तोल ढासळला.

वेगाचा रोमांच खूपच भयानक असा असतो. जागतिक चॅम्पियनशीपमध्‍ये झालेला हा तिसरा अपघात होता. आतापर्यंतच्‍या सुपरबाईक रेसिंगमध्‍ये 200 पेक्षा अधिक युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा अशाच भीषण अपघातांची एक झलक...