आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शराेन पाैलविरुद्ध काेमलची झुंज अपयशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (आय. टी. एफ.) अधिकृत मान्यतेने उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अायाेजित दहा हजार डॉलर्स बक्षिसाची रक्कम असलेल्या स्पर्धेतील मुख्य फेरीला साेमवारपासून प्रारंभ झाला. वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या नाशिकच्या कोमल नागरेने सलामी सामन्यात शरोन पौलविरुद्ध दिलेली झुंज अपयशी ठरली. पाैलने यजमान नाशिकच्या काेमलवर ६-०, ६-० ने मात केली. यासह काेमलचे अाव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात अाले.

सकाळच्या पहिल्या सत्रात झालेल्या या सामन्यात काेमलला शराेनने एकतर्फी लढतीत अत्यंत सहजपणे पराभूत केले. एकाही गेममध्ये काेमलला संधीच न देता ताे पूर्ण सामना तिने एकहाती जिंकला. उर्वरित सामन्यात सिहिका सुन्कारा हिने अक्षरा इसका हिचा ६-३, ६-४ असा पराभव केला, तर स्नेहदेवी रेड्डीने अर्थी मुनियनचा ६-१, ६-० असा पराभव केला. वंशिका साव्ह्नेय आणि साई साम्हीथा चामार्थी यांच्यात झालेला अत्यंत चुरशीच्या सामन्यात साई साम्हीथा चामार्थी हिने ७-५, १-६, ६-३ असे गुण मिळवत विजय संपादन केला. हा सामना जवळपास साडेतीन तास चालला. दुपारच्या सत्रात रिया भाटीया हिने सोह सादिक हिचा ६-१, ६-०, तर भुवन कळवा हिने नंदिनी शर्माला ६-३, ६-३ ने हरवले.

दुहेरीत काेमलकडून माेठी अाशा
नाशिकच्या कोमल नगरे, जिताषा शास्त्री, महारूक कोकणी, अमरीन नाझला वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला. नाशिककरांचे डाेळे अाता दुहेरीतील सामन्यांकडे लागले अाहेत. निथ्या राज बाबू, थानुश्री विरुध्द सोवजन्या बविशेत्ती, रीशिका सुन्कारा (विजयी), महारूक कोकणी, अमरीन नाझ विरुध्द आस्था दरगुडे, मिहिका यादव (विजयी), वंशिका साव्हन्य, वासंती शिंदे विरुद्ध येती महेता, रश्मी तेलतुंबडे (विजयी.

जल्लाेषात सुरुवात
मुख्य फेरीची सुरुवात आयमाचे माजी अध्यक्ष जे. एम. पवार आणि बी. पी. सोनार यांच्या हस्ते नाणेफेक करून करण्यात आली. यावेळी स्पर्धा निरीक्षक नितीन कन्नमवार, संचालक राकेश पाटील, निवेकचे माजी अध्यक्ष रमेश वैश्य, अध्यक्ष संदीप सोनार, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, सचिव राजकुमार जॉली, क्रीडा सचिव संदीप गोयल, समन्वयक रणजित सिंग, कोषाध्यक्ष आशिष महेशिन्का, अरुण आहेर, आशिष अरोरा, प्रशांत साठे, संजय नागरे, श्रीकांत कुमावत, पंकज खत्री, हेमंत कपाडिया, अशोक हेम्बार्डे आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...