आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • It's Just The Beginning, Will Win More Medals: Saina Nehwal‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : भारताच्या फुल‘राणी’ला रथाची स्वारी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लंडन ऑलिम्पिक बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकून मायदेशी परतलेल्या सायना नेहवालचे मंगळवारी हैदराबादेत भव्य स्वागत करण्यात आले. सायना, तिचे प्रशिक्षक पी. गोपीचंद आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप यांची आकर्षक रथातून मिरवणूक काढण्यात आली.
स्वागताने भारावलेली सायना म्हणाली, ऑलिम्पिक पदक जिंकल्याने आपला आत्मविश्वास दुणावला आहे. या पदकामुळे आगामी स्पर्धांत आपल्याला आणखी आत्मविश्वासाने उतरू. ही तर फक्त सुरुवात आहे. मला देशासाठी आणखी पदक जिंकायचे असल्याची सायना म्हणाली. आगामी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकू असा विश्वासही तिने व्यक्त केला.
सायनाने सांगितले की, ऑलिम्पिकमधील यश व सातत्याने माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मी आपले आई-वडील आणि प्रशिक्षक गोपीचंद यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करते. मी पदकासाठी खूप मेहनत घेतली आहे, चाहत्यांच्या पाठबळानेच मला यशस्वी केले आहे. सायनाच्या पत्रकार परिषदेत गोपीचंद यांच्यासोबत तिचे वडील हरवीर सिंह हेही उपस्थित होते.
ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून सकाळी दिल्लीत सायनाचे आगमन झाले. तेथून ती थेट हैदराबादला पोहोचली. विमानतळावर तिच्या स्वागतासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पुष्पगुच्छ-हारतुर्‍यांनी सायनाचे स्वागत करण्यात आले. एका अतिउत्साही युवकाने तर सायनाच्या चेहर्‍यावरच पुष्पगुच्छ फेकला.