आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Its Not Fair To Compare Me To Dhoni Than Lets Constrate On Cricket Ganguli

धोनीशी माझी तुलना योग्य नाही- सौरव गांगुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सध्याचा टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी माझी तुलना करणे योग्य नाही. आपण सर्वांनी तुलना करण्याऐवजी भारतीय क्रिकेटचा विचार केला पाहिजे, असे मत भारताच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.


‘वेळेनुसार नवा कर्णधार, नवे खेळाडू येत असतात. सर्वांचे वेगळे वैशिष्ट्य असते. मात्र, आपण नेहमी एकमेकांची तुलना करीत असतो. कोण सर्वश्रेष्ठ आहे, यावर वाद घालणे मला आवडत नाही. वेळेनुसार परिस्थितीतही बदल होत असतो. भारतीय क्रिकेट नेहमी कसे मजबूत असेल, याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. क्रिकेट नेहमी सांघिक प्रयत्नांनी खेळले जाते,’ असेही गांगुलीने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.


धोनीची मुक्तकंठाने स्तुती
० सहका-यांचे समर्थन करतो : गांगुलीने धोनीची स्तुती केली. तो नेहमी आपल्या सहका-यांचे समर्थन करतो. सुरेश रेना, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि इतर खेळाडूंना धोनीने नेहमी समर्थन दिले आहे. धोनीकडे शानदार नेतृत्वक्षमता आहे. यामुळे तो खास आहे.
० दबाव दिसू देत नाही : धोनी प्रत्येक परिस्थितीला सरळ आणि सोपे करण्यावर जोर देतो. तो यासाठी नेहमी प्रयत्न करतो. त्याच्यावर कितीही दबाव आला तरीही हा दबाव तो दिसू देत नाही. आपल्या दबावाची तो इतरांना जाणीव होऊ देत नाही.
० धोनीच कर्णधार राहावा : ऑस्ट्रेलियात 2015 मध्ये होणा-या वर्ल्डकपसाठी धोनीच्या नेतृत्वाबाबत विचारले असता गांगुली म्हणाला, धोनी अजून युवा आहे. मला विश्वास आहे की पुढच्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याची योजना त्याच्या डोक्यात निश्चितपणे सुरू असेल. तो आपले काम योग्य पद्धतीने करतो. त्याने 2015 च्या वर्ल्डकपमध्ये नेतृत्व केले पाहिजे, असेही दादाने नमूद केले.