आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IVE Mumbai Indians Vs Rajasthan Royals IPL 7 Match Score In Marathi

आदित्यने मुंबईला तारले; विजयासह मुंबई इंडियन्सचा उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राजस्थान रॉयल्सविरुद्ध रंगतदार लढतीत आदित्य तारेने (नाबाद 6) विजयी षटकार ठोकून मुंबई इंडियन्सला तारले. या विजयी षटकारासह मुंबईने आयपीएलच्या उपांत्य फेरीत धडक मारली. मुंबईने रविवारी रात्री राजस्थान रॉयल्स टीमचा 5 गड्यांनी पराभव केला.
कोरी अँडरसन नावाचा झंझावात वानखेडेवर अवतरला. या वादळात राजस्थानचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. मुंबई इंडियन्सने 87 चेंडूंत 190 धावा फटकावण्याचे अशक्यप्राय आव्हान कोरी अँडरसनच्या धुवाधार नाबाद 95 धावांमुळे गाठले. त्याला तोलामोलाची साथ देत रायडूने 10 चेंडूंत 30 धावा फटकावल्या आणि मुंबइने 190 धावा 14.4 षटकांत फटकावल्या. रायडू धावचीत झाला त्या वेळी मुंबईने 189 धावांची बरोबरी केली होती. मुंबईला उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्या वेळी एका चेंडूत चौकाराची गरज होती. आदित्य तारेने फ्युकनरच्या फुलटॉस हूक करून षटकार मारला व राजस्थानचे स्वप्न भंगले. अँडरसनच्या तोडीस तोड अशी फटकेबाजी अंबाती रायडूनेही केली.
संक्षिप्त धावफलक : राजस्थान : 4 बाद 189, मुंबई : 5 बाद 195.
नायर-सॅमसनची शतकी भागीदारी व्यर्थ
संजू सॅमसन (74) व करुण नायर (50) यांच्या 57 चेंडूंतील 100 धावांच्या भागीदारीने राजस्थानच्या धावफलकाला अचानक वेग दिला. त्यामुळे पहिल्या 10 षटकांत अवघ्या 59 धावा काढणार्‍या राजस्थानने नंतरच्या 10 षटकांत तब्बल 130 धावा फटकावून काढल्या.
कोरीचा धमाका
वेगवान शतकाचा विक्रम करणार्‍या न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने रविवारी आयपीएलमध्ये पुन्हा एकदा तुफानी फलंदाजी केली. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध चौकार व षटकारांची आतषबाजी केली. त्याने सामन्यात सर्वाधिक 9 चौकार व 6 षटकार मारले. त्याने 44 चेंडंूत 95 धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय त्याने अशक्यप्राय वाटणारे प्ले आॅफच्या पात्रतेचे लक्ष्य गाठून देण्यात मुंबईला मोलाचे योगदान दिले. यासह त्याने यंदाच्या सत्रातील आपले शानदार पहिले अर्धशतकही झळकावले.
असे रंगतील सामने
० 27 मे मंगळवार रोजी क्वालीफार्इंग -1 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स समोरासमोर असतील.
० 28 मे बुधवार रोजी एलिमिनेटर मध्ये गतविजेता मुंबई इंडियन्स व दोन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना होईल.