आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरच्‍या कसोटीत कॅलिसचे शतक, एकाच झटक्‍यात ब्रॅडमनसारख्‍या दिग्‍गजांना पछाडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डर्बन - करिअरमधील शेवटची कसोटी खेळत असलेल्या सुपरस्टार जॅक कॅलिसने (115) रविवारी शानदार शतक झळकावले. या शतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध दुसर्‍या कसोटीत पहिल्या डावात 500 धावा काढल्या. यासह यजमान टीमने 166 धावांची आघाडी मिळवली. कॅलिसने करिअरमधील 45 वे शतक झळकावून यजमान आफ्रिका टीमला मजबूत स्थिती मिळवून दिली.

जॅक कॅलिसचे शतक ऐतिहासिक ठरले आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी हा कारनामा अनेक वर्षांनी घडला आहे. तसेच कॅलिसने दिग्‍गजांनाही ही कामगिरी करुन मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रिकी पॉंटींग, स्‍टीव्‍ह वॉ हेच काय तर महान सर डॉन ब्रॅडमन यांनाही अखेरच्‍या कसोटीत शतक ठोकता आले नाही. ब्रॅडमन तर शून्‍यावर बाद झाले होते. कॅलिसने या ऐतिहासिक खेळी काही विक्रमही केले आहेत.

कॅलिसने कोणते विक्रम केले.... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये....