आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्‍टपैलू क्रिकेटपटू असलेला जॅक कॅलिस प्रेम प्रकरणांतही होता ऑलराऊंडर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळ डेस्‍क: दक्षिण आफ्रिकेचा अष्‍टपैलू खेळाडू जॅक कॅलीस याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्‍ती स्विकारली आहे. भारताविरुध्‍द डरबनमध्‍ये झालेल्‍या त्‍याच्‍या करिअरच्‍या अखेरच्‍या कसोटीत दमदार शतकी पारी खेळून तो कसोटी क्रिकेटला अलविदा केले आहे.

2013 हे वर्ष क्रिकेटमधील 'दिग्‍गज खेळाडूंच्‍या निवृत्‍तीचे वर्ष' असे म्‍हणता येईल. मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर, रिकी पॉंटिंग, तिलकरत्‍ने दिलशान, राहुल द्रविड आणि आता जॅक कॅलिस यांनी निवृत्‍ती स्विकारली आहे. यांच्‍या कसोटीतील निवृत्‍तीमुळे त्‍यांच्‍या चाहत्‍यांना धक्‍का बसला आहे. सचिनने अतिशय नियोजनबध्‍दपणे निवृत्‍ती स्विकारली तर कॅलिसने निवृत्‍तीचा निर्णय घेऊन क्रिकेट चाहत्‍यांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. हे दोघेही दिग्‍गज त्‍यांच्‍या खासगी आयुष्‍यामध्‍ये फार वेगवेगळे आहेत. सचिन हा मॉडेल्‍स तसेच अन्‍य बॉलिवूड अभिनेत्‍यांपासून दूर राहिला. त्‍याने पहिल्‍या प्रेमाचे रुपांतर जीवनसाथीमध्‍ये केले. तर जॅक कॅलिस याउलट आहे. सौदर्यस्‍पर्धा विजेत्‍या मॉडेल्‍ससोबतच्‍या अफेअर्समुळे दक्षिण आफ्रिकेत नेहमी चर्चेत राहिला.

पुढील स्‍लाइडवर बघा, कॅलिसचे अफेअर्स...